एक तांत्रिक प्रश्न - मनोगत संकेत स्थळाबाबत

माझा अनुभव असा आहे, की "मनोगत" संकेत स्थळ संगणकावर जास्त वेळ चालु ठेवले (ऍक्सेस केले), तर संगणक हळू/मंद/स्लो होतो.


थोडा रिसर्च केल्यावर कळले की,   "C:\Documents and Settings\smhetre\Local Settings\Temp" या फ़ोल्डर मध्ये बऱ्याच  *.tmf फ़ाईल्स जमा असतात. (उदा. tpd7002.tmf )  


या फ़ाईल ची साईज १९३ के बी इतकी असते. अशा अनेक फ़ाईल तयार झाल्याने एकुण साईज बरीच मोठी होते.


संगणकाच्या मुख्य भागावर (मेन ड्राईव्ह C:) हे होत असलेने साहजिकच संगणकावर बराच ताण येतो आणि मग सर्व क्रिया संथ होत जातात.


वर सांगितलेल्या फ़ाईल काढुन टाकल्या की थोडा वेळ संगणक नीट चालतो, नी पुन्हा तेच घडते.


इतर तज्ञ मनोगती अथवा संकेत स्थळ चालवणारे तंत्रज्ञ या विषयी काही माहीती देवु शकतील काय? असे न होण्यासाठी काही करता येवु शकते का?


(ईतर मराठी संकेत स्थळाबाबत असा अनुभव अजुन आला नाही (उदा. "इ सकाळ").


आपला,


--सचिन