सध्या दहावी बारावीचे निकाल लागण्याचे दिवस आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदा गुणवत्ता यादी प्रसिद्ध केली जाईल की नाही याविषयी शंका वाटते. वृत्तपत्रात वाचले त्याप्रमाणे गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल ; पण गुणवान विद्यार्थ्यांचे सत्कार परीक्षा मंडळ करणार नाही. काही वाचकांनी ही यादीही प्रसिद्ध करू नये असे मत मांडले आहे. त्यांच्यामते अशा यादीमुळे पालकांच्या अपेक्षा व आपल्या पाल्याची त्या गुणवान विद्यार्थ्यांशी तूलना करण्याची प्रवृत्ती वाढून विद्यार्थ्यांवर त्याचा ताण (टेन्शन) वाढते तर काही वाचकांनी ही यादी प्रसिद्ध करणे विद्यार्थ्यांसाठी प्रोत्साहक ठरेल असे मत मांडले आहे. मत मांडण्याची आता मनोगतींची पाळी आहे. यादी प्रसिद्ध करावी की न करावी? खरेच त्याचा परिणाम (टेन्शन वा प्रोत्साहन) होतो का ?