बाई माझी लिपस्टीक बिघडली

आजकाल सगळे प्रसिद्ध(!) लोक त्यांचे गाऱ्हाणे मनोगतावर घालण्यासाठी माझ्याच का मागे लागतात कोण जाणे? आता लातूरकरांना  मी ओळखते तरी पण ही कोण कुठली राखी सावंत,हिचा एकही नाच मी पाहिलेला नाही. मागे राखी सावंतवर कोल्हापूरात खटला वाचलं होतं , तेवढीच ओळख! तर ही बाई तिच्या तथाकथित विनयभंगाबद्दल  मराठी जनांकडून दाद मागायला चक्क माझ्याकडे आली. म्हणते कशी-- 


बाई माझी लिपस्टीक बिघडली


(चाल- बाई माझी करंगळी मोडली)


ऐन रातीला पार्टीमध्ये खोडी कशी काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!धृ!!


वाढदिवशी मी विश करताना
काय चावले कुठे मिकीला
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी कळ का काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!१!!


पाठमोकळा ड्रेस घातला
मुका मिकीचा गाली घेतला (लिपलॉक करायचं काही कारण होतं का?)
मी ही चिडले , ठाण्यात पोचले
तक्रार ठोकली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!२!!


जरी स्वतःचा ड्रेस फेडला
मी ही शेवटी भारती बाला
ओठ द्यायचे का कोणाला
जरी लाज सोडली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!३!!


                                   ---   राखी सावंत


(भारवाही - साती काळे)