पुरण पोळी

  • १/४ किलो मैदा, १ वाटी तांदळाची पिठी
  • १/२ किलो चण्याची डाळ
  • १/२ किलो गुळ (चिकीचा गुळ नाही)
  • १/४ वाटी तेल, दुध, केशर,साजुक तुप
  • जायफळ पूड, वेलची पूड, १" सुंठेची पूड, १०/१२ काळे मिरी पूड,
  • मीठ चवीपुरते
२ तास
२ जणांसाठी

चण्याची डाळ स्वच्छ धुवुन पाणी घालून शिजत ठेवावी. डाळ शिजली की चाळणी मधे ओतावी, डाळीचे पाणी व थोडी डाळ कटाच्या आमटी साठी बाजुला काढावी.

कोरड्या डाळीमध्ये चिरलेला गुळ घालुन पुन्हा शिजवावे. पुरण चांगले शिजले की त्यात १ चमचा साजुक तुप , जायफळ पूड, वेलची पूड, सुंठ पूड ,मिरी पूड घालावे. नंतर पुरणयंत्रातुन पुरण गरम असताना घालुन पुरण तयार करावे.

मैदा चाळून घ्यावा. त्यात  चवीपुरते मीठ घालावे. वाटीभर दुधामधे केशरकाड्या घालाव्या. मैद्यामधे तेल घालुन मोहन करावे. नंतर दुधाने सैलसर मळावे.

१ लिंबाच्या आकाराचे कणिक घेऊन त्याच्या पारीमधे , २ लिंबाच्या आकाराचे पुरण भरुन पारीचे तोंड बंद करावे. हा गोळा तांदळाच्या पिठीवर हलक्या हाताने पोळी लाटावी.

तवा मध्यम आचेवर ठेवावा त्यावर पोळी भाजावी. पोळीच्या दोन्ही बाजुला साजुक  तुप लावावे. खमंग पुरणपोळी तयार.

ही पुरणपोळी तुम्ही कटाची आमटी, साखर दुध ह्या सोबत खाऊ शकता.

माझी आई