मी पाहिलेल्या काही सत्य घटना

खालील घटना सत्य आहेत.



  • आमच्या गावात एक माणूस राहतो. तो फारसा कधी कोणाशी बोलत नाही. त्याने एकदा मला सांगितले की त्याने एक रोपटे पाहिले होते. त्याची मुळे जमीनीच्या वर आणि पाने जमीनी खाली होती.
    हे विज्ञानवादी अभ्यासक फक्त अभ्यास करण्याच्या हेतूने त्या अद्भुत झाडाचा नाश करतील म्हणून मी पर्यावरणवादाच्या भूमिकेतून त्या झाडाचे नाव आणि ठिकाण सांगत नाही.
  • एकदा माझ्या एका मित्राच्या परिचिताने आफ्रिकेच्या जंगलात एक बाबा पाहिले होते. ते खारीप्रमाणे आकाशात उडू शकत होते आणि घोड्याप्रमाणे पाण्यावरून धावू शकत होते.
    अंधश्रद्धानिर्मुलनवाल्यांनी त्यांना खूप त्रास दिला होता. म्हणून मी ताकही फुंकून पितो. मी त्यांचा पत्ता कोणालाच देणार नाही.
  • माझ्या आजीच्या मैत्रिणीने मला एका बाबांबद्दल सांगितले होते. त्यांच्या आश्रमातल्या झाडाचे आंबे तोडले की त्यांची गुलाबाची फुले व्हायची. तिच्याकडे त्याचे व्हिडिओ शूटिंग आहे. मिळाले की पाठवतो.

जर कोणाला असत्य वाटल्या तर..........