मानहानी चा दावा करता येईल काय????

आज संशोधन शाळेत काम करत असतांना माझ्या प्रोफ़ेसरांच बोलावण आल्यामुळे (गमंतीने आम्ही 'वारंट' सुटलं अस म्हणतो!) मी त्यांच्या खोलीत गेलो. संगणकावर त्यांनी मला त्यांना आलेला एक निरोप दाखवला, ज्यामधे माझ्यासंबंधी उलटसुलट मजकुर खरडलेला होता. ज्या व्यक्तिकडुन निरोप आला होता तिला मी ओळखत नाही. "लपलेला शत्रु अधिक धोकादायक असतो" असा मोलाचा सल्ला देऊन त्यांनी माझी बोळवण केली.


संगणकिय क्षेत्रातला 'दहशतवाद' आज मी अनुभवला ! पण निषेध करुन गप्प न बसता मी ह्यावर काही कायदेशीर इलाज करता आला तर पहावे,ह्या हेतुने मी महाजाळावर थोडीफ़ार शोधाशोध ही केली ! ह्या बाबतीत 'मनोगती' कडुन अधिक माहिती मिळु शकेल का?


संगणकिय क्षेत्रातले माझे ज्ञान अगदी तोडके आहे, महाजालावर शोधाशोध करुन मी काही माहिती काढली आहे. त्यावरुन मला इतकेच समजले कि हा निरोप मुंबईहुन आला होता. पण नेमका पत्ता कसा काढावा ते मला माहित नाही. ह्या संबंधी कोणाकडे तक्रार करता येईल? कायदेशीर कारवाई कशी करावी?


काही संर्दभ देत आहे, अधिक माहितीची गरज असल्यास मी ती हि उपलब्ध करुन देऊ शकेल.


निरोप आल्याची वेळ १४ जुलै २००६ १४; १७ ;११ +०००० (रेडिफ़ निरोप्या)


 इंटरनेट प्रोटोकॉल २०३.११५.११७.२६


देश क्रमांक ११३


प्रादेशिक क्र. २१८२


शहर क्र. ६४५७


ठिकाण (कोड) INMHMUMB


Latitude १८.९६९७

Logitutude ७२.८३३०


ह्यासंबधी मनोगतींची चर्चा देखिल मला मोलाच मार्गदर्शन करु शकेल, असा मला विश्वास वाटतो.