आपण विष्णुचा १० वा अवतार कल्कि असा मानतो आणि तो कलियुगाच्या शेवटी होतो असं पण मानलं जातं. तर मग जो अवतार अजून झालाच नाही त्याची जयंती आपण श्रावण महिन्याच्या सुरुवातीला का साजरी करतो?
असं तर नाही की हा अवतार मागे होवून गेलेल्या कलियुगातील आहे? तसं असेल तर त्या अवतारात कुठली कार्य केली गेली?
Please (कृपया शब्द काहिसा उध्दट वाटतो) ही चर्चा नास्तिक/आस्तिक, धर्म-थोतांड आणि विज्ञानवादा, यांकडे वळवू नये. मला या चर्चेतून माहिती अपेक्षीत आहे वाद नाही ः-)