ओला कोकण

ओला कोकण कोकण
ओल्या पावसाच्या सरी
लाटे लाटेनं उठत
आला सागर की दारी




ओला कोकण कोकण
पानोपानी थेंब थेंब
बागेतली पोफळीही
झाली किती ओलीचिंब


ओला कोकण कोकण
ओला गार सुटे वारा
मोगरीच्या वेलीला गं
ओला नाजूक थरारा




सख्या ओल्या कोकणात
मन माझे ओलावले
तुझा हात हातात ते
क्षण कारे दुरावले...