जन्मशताब्दी - फक्त वंदे मातरमचीच नव्हे...

नमस्कार मंडळी,


सर्वप्रथम वंदे मातरम् गीताला आणी त्यामुळे चालू झालेल्या स्वातंत्र्य चळवळीला नमस्कार!


त्यावरून चालू असलेला तमाशा आपण वाचत असालच. सर्व सत्ताधारी या जन्मशताब्दीचा राजकीय फायदा उठवत आहेत. पण गंमत म्हणजे, अजून एक जन्मशताब्दी ११ सप्टेंबरला येत आहे, विशेष करून काँग्रसवाले विसरत आहेत (भाजपला काही पडले नसावे असे कदाचित चुकीचे पण गृहीत). जर असे लिहिण्यात माझी काही चूक होत असेल तर सांगा. नसल्यास जन्मशताब्दी कसली ते खाली पाहा



महात्मा गांधींनी ११ सप्टेंबर (तारखेच्या बाबतीत विचित्र योगायोग..)ला १९०६ साली जोहान्सबर्गला भारतीयाची सभा घेऊन प्रथमच अहिंसेचा शस्त्र म्हणून वापर केला


जर आपण आणि आपले गांधीजींच्या नावाने गळा काढणारे राज्यकर्ते ही गोष्ट विसरले असले तर याचा नक्की अर्थ काय?





    1. अहिंसा कालबाह्य झाली की


    2. गांधीजी का


    3. गांधीवाद का


    4. आपण निर्विकार?

 कृपया यात सद्यस्थितीवरून (जर लिहिले तर) लिहा, शिळ्या कढीला ऊत नको!