सदैव माझ्यासमोर असतो तुझा चेहरा
डोळे मिटल्यावरही दिसतो तुझा चेहरा...
तुला रोखुनी, न्याहाळुन मी बघतो तेव्हा
रक्तिम रंगाने रसरसतो तुझा चेहरा...
तुझा चेहरा इतका माझ्या समोर असतो-
आरशात मी बघून फसतो तुझा चेहरा...
गोंधळतो मी मैफलीतल्या गर्दीमध्ये
खूप शोधतो- कुठेच नसतो तुझा चेहरा...
खरे तुला मी किती काळ बघितलेच नाही!
उगीच वाटत आहे रुसतो तुझा चेहरा...