बकती समाजवादी बो-टाय लावणारे


बकती समाजवादी बो-टाय लावणारे
हिंदुत्व द्वाड वारे चड्डीत वाहणारे


ते बेसुरेच सारे असतात जे भुकेले
संतृप्त वंचितांचे ओहो! सुरेल नारे

आता कसे कळावे कोणी सुवास केला?
बघतात एकमेकां दाबून नाक सारे


आला समानतेचा आता खरा जमाना
मी पाहिल्या मुलींच्या शिट्ट्या नि हातवारे!


जे जंगलात ते ह्या सोसायटीत आहे
असतात वाघ जेथे असणार वाघमारे


'टीकाराम'