हुतात्मा भगतसिंग आणि गांधी - ४

गांधींनी हुतात्मा भगतसिंग, राजगुरु, सुखदेव व राजगुरु यांच्या फाशी रद्द करण्याचे प्रयत्न केल्याचा दावा फोल कसा ते उघड झाले आहे. मुळात गांधी हुतात्मा भगतसिंग यांचा अत्यंत तिरस्कार व द्वेष करत होते. त्यामुले साहजिकच ते असे प्रयत्न करणार नाहीत हे स्पष्ट आहे. मात्र त्यांनी असे हीन कृत्य करण्यापेक्षा रदबदलीस स्पष्ट नकार दिला असता तर बरे झाले असते. मनात एक आणि मुखात एक असे कशाला? हुतात्मा भगतसिंग यांच्याविषयी गांधींच्या मनात किती द्वेष होता याचे एक उदाहरण:


हुतात्मा वासुदेव बळवंत गोगटे यांनी सोलापूर मार्शल लॉ मध्ये जनतेवर अत्याचार करणाऱ्या हंगामी गव्हर्नर अर्नेस्ट हॉटसन याला पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या ग्रंथालयात गोळ्या घालून यमसदनास धाडले व त्यासाठी हौतात्म्य पत्करले. हुतात्मा गोगटे यांच्या तेजस्वी कृत्याची निंदा करताना दिवंगत हुतात्मा भगतसिंग यांचीही गांधींनी त्यांच्या पश्चातही निंदा केली. वास्तविक आपल्या संस्कृतित मृताविषयी अनुदगार काढत नाहीत पण गांधींनी काढले. आपल्या यंग इंडीया मध्ये गांधींनी असे लिहिले की " भगतसिंगाच्या जयजयकाराने या देशाची अपरिमीत हानी झाली आहे, आणि तो ती आजही करीत आहे. भगतसिंहाच्या शिलामुळे मी वाहवलो गेलो आणि कराचीला सावधगिरीने संमत केलेल्या ठरावाशी मी सहमत झालो. ती सावधगिरी फेकून दिली गेली आणि त्या कृत्याचीच अनुकरणीय म्हणून पूजा केली जात आहे याचा मला खेद होत आहे. मी कॉग्रेसवाल्यांना चेतावणी देतो की जर त्यांनी भगतसिंग पंथाला उत्तेजन दिले तर काँग्रेसचे आकर्षण्च नष्ट होईल"


हे गरळ पाहता गांधींनी भगतसिंहाचे केलेले तत्क्षणीचे कौतुक व तसा लेख हा किती खोटेपणाने व केवळ स्वतःची लोकप्रियता राखण्यासाठी व कोंग्रेसच्या तरुण सदस्याना दुखावणे परवडणारे नसल्याने नाइलाजास्तव लिहिला होता हे समजून येते.


या लेखनातून हे देखिल उघड झाले की त्यांना काळजी देशापेक्षा काँग्रेस पक्ष व त्यावरील आपले अमर्याद नियंत्रण व हुकुम याची होती.