मराठी साहित्यातील मैलाचे दगड

बरेच पूर्वी-९०चे दशक- महाराष्ट्र टाईम्सने प्रसिद्ध केलेली  मराठी वाङ्मयाचे मैलाचे दगड या शीर्षक खाली १०० मराठी वाङ्मयीन कृतींची निवड   स्मरते.ज्या वाङ्मयीन कृतींनी मराठी साहित्य,संस्कृती,समाजात मोठा बदल केला किंवा कळस गाठला त्यांची नोंद घ्यावी व विसर पडू नये असा उद्देश होता.असाच प्रयत्न मनोगतवरही व्हावा असे वाटते.



  • या दृष्टीने मापदंड काय असावेत?


  • असा प्रयत्न इतरत्र झाले असतील तर त्याचे संदर्भ द्यावेत.


  • मराठी साहित्याला मिळालेले वळण व सांस्कृतिक  योगदान स्पष्ट करावे.

  • समीक्षणांचे शक्य तीथे संदर्भ द्यावेत.

  • या प्रक्रियेला वेळ लागणे अपेक्षीत आहे.तेंव्हा या चर्चा पानाची वाचन खूण बनवून घ्यावी.

  • वैयक्तिक दृष्टिकोनांचे चष्मे काढून ठेवावेत, तटस्थ व सर्वसमावेशकता ,सर्वसंमती असावी, 

  • साहित्यिक व मनोगती बद्दल वैयक्तिक टिका टाळावी .

म.टा. ने प्रसिद्ध केलेल्या यादीने मला पु.शि.रेगेंच्या 'सावित्री' सारख्या कादंबरीचा परिचय होउ शकला असेच अमृत या मंथनातून सर्व मनोगतींना गवसावे ही सदिच्छा!


-विकिकर