पुणेरी कट्टा भाषा.. काही नमुने

केशव: नाकासमोर चालणारा , कुणाच्या अध्यात-न-मध्यात पडणारा, गरीब सरळमार्गी


वडिल: बापमाणुस, उच्च , भारी भक्कम


य / ट / न : अगणित, खुप


सामान: पहिला अर्थ- गर्ल फ़्रेंड, दुसरा अर्थ-(......)


खडकी : एकदम टुकार, स्वस्त सवंग, हिणकस


काय राव बास का? : 'हाय' 'हलो' ऐवजी


मस्त रे कांबळे : काही चांगले काम झाले किंवा चांगले बोलले तर म्हणायचे वाक्य


पडिक: एकाच जागी , बिनक़ामाचा बसुन असणारा, नेहमी एका ठराविक़ जागीच आढळणारा


एल.बी.डब्ल्यु. : १> (ती मुलगी ) लांबुन बरी वाटते / वाटली


                    २> लई बिल वाढले (आता बास करा..)


 


पोपट झाला: फजिती झाली, कुणीतरी फिरकी घेतली, मामा बनवला


द्त्तु: एखाद्याच्या आजुबाजुला फिरणारा, हलकी कामे करणारा, नोकर, असिस्टंट


बाबुराव : याचे ३ अर्थ आहेत- १> मुर्ख २> अम्रुततुल्य हौटेल मध्ये मिळणारा क्रिमरोल ३> (....)


पुडी : गुट्खा


१२० घेणे: पळुन जाणे १२० कि.मी.प्रती तास च्या वेगाने


ह्त्ती : खुप मोठा पोपट ( पहा: पोपट)


पेटाड: खुप दारु पिणारा


मारा डबल: चल जा आता (फुट / कट आता)


नाष्टा: कपड्यावर पक्षांनी घाण करणे


टिळक वर्ष: नापास झाल्यामुळे वाया गेलेले वर्ष


पप्पु: पिताश्री (ते नेहमीच परम पुज्य असतात)


दे ढिल : म्हणजे समोरचा माणुस जरी बाता मारत असला तरी चालु राहुद्यात


तु ह्प्पस , मी गूंडाळतो: म्हणजे समोरचा माणुस जरी बाता मारत असला तरी चालु राहुद्यात, फ़ार बोअर झाले तर मी थांबवतो


ढिगारा: खुप म्हणजे खुपच जाड व्यक्ती


भागवत: दुस-याच्या जीवा वर जगणारा ऐतखाउ


मिठाईचे दुकान: खुप पोट सुट्लेला


केळे मिळणे: प्रेम भंग होणे, चार चौघात अपमान होणे.


फणस लावणे: नस्त्या शंका कुशंका काढुन मोडता घालायचा प्रयत्न करणे


सेंट अबु: आबासाहेब गरवारे कॉलेज


चड्डी: खुप दोस्ती असणे : तो त्या अमक्याची चड्डी आहे.


यंत्र / यंत्रणा : खुप जाड मुलगी


एम.एल.ए. :  *** लायक आंटी


पाकीस्तान: संडास / मुतारी : जरा पाकीस्तान ला जाउन येतो


जा टोकावर : खड्ड्यात जा, मर


मोर घेणे: आणखी मागणे


चाबुक: एक्स्पर्ट


टॉमी: लाळघोट्या


बी.बी.सी. करणे: बातम्या पसरवणे


लई बिल वाढले : बास कर आता फार बोअर झाले


काठी धरणे: एखाद्याची खुप फिरकी घेणे


घ्या श्रीफळ : चला निघा आता ( कटा आता, फार झाले)


छापी लावणे: एखाद्याची फिरकी घेणे, घोळात घेणे


गणपती काढणे : श्रीमुखात भडकावणे


ट्यंकर: दारुडा


कटपिस: ३६:२४:३६


रताळे: बधीर


टाकी: अट्ट्ल बेवडेबाज


आत्याबाई: सतत दुस-याला नावे ठेवणारा



जॉर्ज: अमेरिकन पद्धतीचे ईग्रजी बोलण्याचा केविलवाणा प्रयत्न करणारा


बिल: लफ़डेबाज



मोहन: वासु


हाजी : लाळ घोट्या ( हॉ जी हॉ जी करणारा)


बिजागीरी: सतत कुरकुर करणारा


पावा वाजणे: काम न होणे


वामन्या: प्राध्यापक अथवा हॉटेलच्या गल्ल्यावरचा शेट्टी


चखणा: फ़ुकट दारु ढोसणारा



सखाराम: रेड लाईट एरियात जाणे येणे असणारा


मापाड्या: नुस्त्या चौकशा करणारा


बि एच एम बी : बडा होके माल बनेगा


यदा यदा : बोलणारी व्य्क्ती फ़ेकाफ़ेकी करते आहे


एफ़ टी पी सर्व्हर : फ़ुल टाईमपास व्यक्ती


एमेस डॉस: मसाला डोसा


पिशवी: खुप काकुबाई मुलगी



थैली: पैसेवाल्या बापाची मुलगी


 



सि.ए. : पुर्ण आराम


अझमात: अपने झमाने में माल थी


गरम कोट: कंडोम


कुल्फ़ी: थंडगार, कोणालाही कसलाही रिस्पॉन्स न देणारी , सरळमार्गी- मुलगी



महाडिक: सतत 'त्या' विषयावर बोलणार, 'तसली' मासीके, पुस्तके वाचणारा, 'तसल्या' फ़िल्म्स बघणारा


एस कुमार: ज्याचे पोट आणि पार्श्वभाग दोन्ही प्रमाणाबाहेर सुट्ले आहे अशी व्यक्ती.


अलिबाग हुन येणे / अलिबाग हुन आलेला: बावळट


बहाद्दुर: खुप गप्पा मारणारा पण प्रत्यक्षात काही काम न करणारा


कावळा: आडोश्याला लपलेला  वाहतुक पोलीस


पुस्तक: जरा मोठी वक्ष़स्थळे असलेली मुलगी


दिलदार: जरा मोठी वक्ष़स्थळे असलेली मुलगी



बासरी वादन: सिगारेट ओढणे


दंडवते काकु: न शोभणारे स्लीव्हलेस ब्लाऊज घातलेली प्रौढ महिला


गलबत: दारु पिउन डोलणे


बंगल्यावर भेटा आता: तुमच्या मागण्या फ़ार वाढताहेत


मंदार: जरा मंद बुद्धीचा, ट्युबलाईट


उसगावकर: अमेरिकेत गेलेला / अमेरिकेहुन परत आलेला


वेलांटी: लग्न झालेली पण अजुन बरी दिसणारी


बापु / झापु : बालगंधर्व पुल / झेड ब्रिज


मन मोकळे करणे: स्वच्छता ग्रुहाला भेट देणे