अपशब्द

शिव्या देणे अपशब्द उच्चारणे केव्हाही वाईटच. पण या बद्दल कोणी काही ज्ञान देउ लागला की लोक नाकं का मुरडतात? हे नक्कीच मौलिक ज्ञान नाही. पण असे अपशब्द माहीतच नसावे असे का? त्याशिवाय आपल्याल कसे कळणार की आपल्याबद्दल माणसे वाईट बोलतायत ते? किमानपक्षी आपल्याला कसे कळणार की समोरचा माणूस चिडलाय आता आपल्याला गप्प बसायचे आहे? ( हे असे हलक्याप्रकारचे ज्ञान वापरायचे नसतेच. सभ्य माणसे "सदगृहस्था" सारखे शब्द सुद्धा आवाजात बदल करून अपशब्द म्हणून वापरतात)