बटाटेवडे प्रकार १

  • १/२ किलो बटाटे
  • २-३ कांदे
  • ७-८ लसूण पाकळ्या
  • १ इंच आल्याचा तुकडा
  • ५-६ हिरव्या मिरच्या
  • १ लिंबू
  • चवीनुसार मीठ
  • साखर
  • १ चमचा जिरे
  • कढीलिंब
  • फोडणी
  • ३ वाट्या डाळीचे पीठ
  • तळण्यासाठी तेल
१५ मिनिटे
दोन माणसांना एक वेळ

बटाटे उकडून, सोलून, कुस्करून घ्यावेत. कांदा बारीक चिरून घ्यावा. जिरे, मिरच्या, लसूण बारीक वाटून घ्यावे व कुस्करलेल्या बटाट्यात घालावे. तसेच लिंबू पिळावे. १ डाव तेलात फोडणी करून त्यात कढीलिंब, कांदा घालावा व त्यातच बटाट्याचे मिश्रण, कोथिंबीर, थोडे मीठ घालून चांगले हलवून घ्यावे. मिश्रणाचे आवडीप्रमाणे लहान-मोठे वडे करून घ्यावेत. वड्याच्या आवरणासाठी डाळीच्या पिठात चवीपुरते तिखट, मीठ घालून पीठ भिजवावे व या भिजलेल्या पिठात वडे बुडवून घेऊन तेलात तळावेत.

तेल पुरेसे तापलेले असेल ह्याची खात्री करावी.

ईसकाळ मधले रूचिपालट सदर