इस्लामाबादच्या प्रेमात...

खालील लेखाबद्दल काही प्रतिक्रीया?


-------------------------------


 


Printed from Indiatimes - Maharashtra Times



 
इस्लामाबादच्या प्रेमात...


[ Saturday, November 25, 2006 04:43:57 am]
 
येऊन जाऊन राहणं आणि इथलंच होऊन राहणं यात निश्चितच फरक आहे. पण माझी इस्लामाबादबद्दलची मतं बदललेली नाहीत. स्वच्छ रस्त्यांचं, हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेलं इस्लामाबाद मला पहिल्या भेटीतच खूप आवडलं. आणि त्याहून अधिक आवडली इथली माणसं. एक भारतीय राजनैतिक अधिकारी (इंडियन डिप्लोमॅट) म्हणून सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी लागते इतकंच. पण मला माझ्या निवडीबद्दल खंत अजिबातच नाही.


कारकीदीर्च्या सुरुवातीच्या काळातच मी पाच-सहा वेळा पाकिस्तानला येऊन गेले होते. माझं पदच तेव्हा अंडर सेक्रेटरी, पाकिस्तान असं होतं. तेव्हा दिल्लीत बसून 'पाकिस्तान डेस्क'ची जबाबदारी सांभाळत होते. नटवरसिंग परराष्ट्र व्यवहार मंत्री होते तेव्हा त्यांच्या शिष्टमंडळासोबत माझ्या या पाकिस्तान वाऱ्या झाल्या. अगदीच अनपेक्षितपणे मी चक्क पाकिस्तानच्या प्रेमातच पडले. स्वच्छ रस्त्यांचं, हिरव्यागार टेकड्यांनी वेढलेलं इस्लामाबाद मला पहिल्या भेटीतच खूप आवडलं. आणि त्याहून अधिक आवडली इथली माणसं. त्यांना सतत भारताबद्दल आणखी जाणून घ्यायचं असतं. आपण भारतात कधी आणि कसे गेलो, आपले कोण-कोण नातेवाईक तिथे आहेत, हे सगळं भरभरून बोलायला ही माणसं कधी थकतच नाहीत. आणि अदबशीर तर किती! हॉटेलचा स्टाफ, ड्राइव्हर्स, सगळेच. एक बाई म्हणून ते तुमचा इतका आदर करतील की तोड नाही. म्हणूनच मी स्वत:हून अर्ज केला आणि 'पाकिस्तानचं पोस्टिंग' मागून घेतलं. मला पाकिस्तानच्या पोस्टिंगसाठी पात्र समजण्यात आलं, याचा मला खूप आनंद आहे.


येऊन जाऊन राहणं आणि इथलंच होऊन राहणं यात निश्चितच फरक आहे. पण माझी इस्लामाबादबद्दलची मतं बदललेली नाहीत. एक भारतीय राजनैतिक अधिकारी (इंडियन डिप्लोमॅट) म्हणून सुरक्षिततेची अधिक काळजी घ्यावी लागते इतकंच. पण मला माझ्या निवडीबद्दल खंत अजिबातच नाही.


रोज सकाळी कारने पंधरा-वीस मिनिटांचा प्रवास करून मी माझं ऑफिस गाठते. सकाळी घरी पेपर्स वाचले तरी आणखी सहा-सात वृत्तपत्रं गाडीत नजरेखालनं घालावीच लागतात. पण ते काम करता-करताही मी बाहेरच्या निसर्गसौंदर्याचा लुत्फ उठवायला विसरत नाही. सध्या तर इथला मौसम फारच छान आहे! थंडीचे दिवस आहेत. त्यामुळे आकाश स्वच्छ निळं असतं. सुंदर चकाकतं ऊन आणि हिरव्यागार टेकड्या... दिवसाची सुरुवातच अगदी रिफ्रेशिंग होऊन जाते. इस्लामाबादेत 'कॉन्स्टिट्युशनल अॅव्हेन्यू' नावाचा भाग आहे, तिथं पाकिस्तानच्या सर्वाधिक महत्त्वाच्या इमारती आहेत आणि त्याच्याच एका टोकाला 'डिप्लोमॅटिक एन्क्लेव्ह' आहे. या एन्क्लेव्हमध्ये आमचं ऑफिस आहे. इथं त्याला 'हाय कमिशन' म्हणतात.


सध्या भारतात संसदेचं अधिवेशन सुरू असल्यामुळे आमच्यावर कामाचा पराकोटीचा ताण आहे. रोजच्या रोज परराष्ट्र व्यवहार खात्याला प्रश्ानंच्या उत्तरांसाठी माहिती पुरवावी लागते. शिवाय नेहमीची कामं तर असतातच. पाकिस्तानच्या अंतर्गत राजकारणाकडे लक्ष ठेवून त्यासंदर्भातले अहवाल पाठवावे लागतात. चर्चासत्रं आणि परिषदांना उपस्थित राहणं हे तर रोजचंच. मग राजदूतांना त्याचं ब्रीफिंग द्यावं लागतं. तिथं काय झालं, कोण-कोण भेटलं वगैरे वगैरे. शिवाय, अधिकाधिक पाकिस्तानी अधिकाऱ्यांना जाणून घेणं, संपर्क प्रस्थापित करणं हेही आहेच.


या सगळ्यासोबत रोज कुणाचे न् कुणाचे स्वागतसमारंभ असतात. कधी इतर कुणा देशाच्या हाय कमिशनचे तर कधी आपल्याकडूनच. आपलेच कुणी मंत्री वा शिष्टमंडळ आलेलं असतं. प्रोटोकॉलची (राजशिष्टाचार) कामंही करायची असतात. उदाहरणार्थ, चीनचे अध्यक्ष हु जिंताओ यांच्या पाकिस्तानभेटीत भारतीय उच्चायुक्तालयाचं प्रतिनिधित्व माझ्याकडे आहे. त्यासाठीची तयारी हेच मोठं काम असतं.


रोज संध्याकाळी साधारणपणे सहा वाजता मी ऑफिसमधून निघते. पण म्हणजे कामाचे तास संपले असं होत नाही. ऑफिसचं काम जवळपास रोजच संध्याकाळही व्यापून उरतं. स्वागतसमारंभ आणि डिनर्स यांना उपस्थित राहणं हे सगळं फार गंभीर स्वरुपाचं कामच असतं. कधी एखाद्या शिष्टमंडळासाठी मला माझ्या घरीदेखील डिनरचं आयोजन करून यजमानपद सांभाळावं लागतं. तमाम पाकिस्तानी मंडळींना तेव्हा आमंत्रित करावं लागतं.


हे 'सारं' करत असताना मला माझ्या अवघ्या सहा महिन्यांच्या छकुलीसाठी रोज किमान दोन ते तीन तास काढायचे असतात. मग घराकडे निघाले की लगेच आईला कळवते. घरी पोहोचल्यावर तिला पाजायचं, न्हाऊ घालायचं, निजवायचं... किमान एवढं तरी तिच्यासाठी केलं की अपराधीपणाची भावना थोडी कमी होते...


माझे पती सध्या दिल्लीत असतात. दिल्ली युनिव्हसिर्टीत प्राध्यापक आहेत ते. अधूनमधून येऊन जाऊन असतात. पुढच्या वषीर् बहुदा ते सहा-सात महिने तरी आमच्यासोबत राहतील. सध्या तरी आमच्या घरी 'स्त्रीराज्य' आहे. मी, माझी मुलगी अमेया, आई आणि आमची बाई...


अजून मी इस्लामाबादेत स्थिरावतेय. अधिक सोयीचं असं घर शोधतेय. इट्स अ हार्ड लाइफ. पण इंटरेस्टिंगही तितकंच आहे...


देवयानी खोब्रागडे