नारायण मूर्ती आणि राष्ट्रगीत.

मध्ये काही वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचली होती की पुढील राष्ट्रपतीच्या पदासाठी नारायण मूर्ती यांचा विचार व्हावा अशी काही लोकांची इच्छा आहे. ही बातमी ऐकून मलाही बरे वाटले आणि असे झाले तर एक चांगला पायंडा पडेल असे माझे मत झाले. त्याचबरोबर राजशिष्टाचार मूर्तींना पाळणे कितपत शक्य होईल असाही एक विचार मनात तरळून गेलेला आठवतो.

त्याच ओघात खालील बातमी वाचण्यात आली. कर्नाटकामधील पोलिसखाते राष्ट्रगिताचा अवमान झाल्याबद्दल मूर्तीवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे असे कळते.

खरेतर कोणतीही नवीन सूचना करण्यात आलेली असताना एकदम गुन्हा दाखल करण्यात यावा हे हास्यास्पद वाटते. याबाबतीत म. गांधींनी सुद्धा सांगितले होते की राष्ट्रगिताच्या वेळेस उभे राहणे हा पाश्चिमात्य शिष्टाचार आहे आणि भारतीयांवर याची सक्ती करणे अयोग्य ठरेल.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/1907671.cms