अस्थिपंजर ,व्यक्तिसापेक्ष स्वप्नांच्या
कोरफडी पाकळ्या उशाशी घेऊन
उन्मादित नितळ झोप घेणाऱ्या
पापणीबंद गारगोट्यांपेक्षा
गोलाईदार, सप्तरंगीत वास्तवाचे
कैक बुडबुडे सूर्यप्रकाशाच्या
कैफात रिचवून गरगरणारे
बुबुळाधिष्ठीत काचमणीच
नियतीशी
"एकलम खाजा"
खेळताना वापरले तर
ढोपरी काढताना
कोपर फुटले तरी
अश्रूंचे रक्त ठिबकत नाही!!!