वृत्त पेलणे सोपे नसते...
शब्द बदलणे सोपे नसते!
फार आज़चे 'डावे' उज़वे!
('हात' मिळवणे सोपे नसते)
ट्रेडमिलवरी पडता कळले -
वज़न घटवणे सोपे नसते!
घे अज़ून; पण - थोडी, थोडी...
मद्य रिचवणे सोपे नसते...
ब्रेड संपला, ही माहेरी,
(भात लावणे सोपे नसते...)
प्रेज़, अन् शिव्या - दोन्ही मिळती
काव्य पाडणे सोपे नसते
- चक्रपाणि चिटणीस, कॅलिफ़ोर्निया
प्रेरणा: कुमार ज़ावडेकरांची सोपे नसते ही गझल, इकडचे-तिकडचे अनुभव, आज़कालच्या घडामोडी, मनोगतावरील इतर विडंबनकारांचे कर्तृत्त्व
आणि इतर