एसीपी मनोहर

पांढऱ्या रंगाची मोटार तिच्या बॉनेटवरील छोट्या तिरंग्याला फ़डकावत ,पोलिस कमीशनर ऑफ़िसच्या मुख्य दरवाजातून बाहेर पडून,डाव्या बाजूला वळाली.तिच्या पाठोपाठ एक जीपगाडी बाहेर  पडली अन् पांढऱ्या मोटारीच्या मागे सुरक्षित अंतर ठेवून धावू लागली‍. जी.पी. ओ.मागे पडले‌.साधू वासवानींच्या पुतळ्याला डावी घालून पुढे अलंकार चौकापर्यंत या गाड्या आल्या आणि चौकात ट्रॅफ़िक कंट्रोल करणाऱ्या पोलिसाची पाठ पाहून ड्रायव्हरने कचकन् ब्रेक लावल्याने पांढरी मोटार थांबली.तिच्या मागोमाग येणाऱ्या जीपला थांबावेच लागले.पुढील गाडीतील ड्रायव्हरने  गाडी थांबल्या-थांबल्या पान परागची पुडी काढली.ती दातात धरून ,त्याने तिची वरची कड तोडली आणि तोंडाचा आऽ वासून त्या पुडीतील आख्खा मसाला तोंडात रिकामा केला.पुडीचा कागद चुरगाळून उजव्या बाजूच्या उघड्या खिडकीतून फ़ेकून दिला.मागच्या जीपच्या ड्रायव्हरने  ही स्टियरींग व्हीलवरील हात न काढता ,फ़क्त मान वाकडी करून  उजव्या बाजूला पिचकारी मारली‍‍. झेब्रा-क्रॉसचा पट्टा निम्म्यापेक्षा जास्त पार करून पुढे थांबू पहाणाऱ्या बाईक चालकावर त्या पिचकारीचा वर्षाव झालाच. बाईक -स्वाराने मागे येवून ,काही म्हणायच्या आधीच,हिरवा सिग्नल मिळाला अन् पुढची गाडी सुरू झाली.जीप ड्रायव्हरने ही त्या बाईक-स्वाराकडे न पाहिल्यासारखे केले अन् पुढची गाडी-पांढरी ऍंबॅसिडर वळाली,त्या दिशेने जीप दामटली. त्या बाइक-स्वारानेही पुढे नजर ठेवून ,बाईक अशी पळविली की,'धूम' मधल्या 'जॉन अब्राहम'ला ही धडकी भरावी ! अँबॅसिडरला फ़ार लांब जायचे नव्हतेच.तिने पुणे-रेल्वे स्टेशन आवाराचे दिशेने वळण घेतले.तिच्या पाठोपाठ जीप गाडी ही घुसली.

          फ़्लॅट-फार्म क्र.१ वर,कोल्हापूरहून  येणाऱ्या,रेल्वेने नवे एसीपी मनोहर उतरणार होते.त्याना आणण्यासाठी म्हणजे उतरवून घेण्यासाठी ती पांढरी ऍंबॅसिडर व ती जीप आलेली. अँबॅसिडर  'नवीन एसीपी'साठी होती,तर जीप नव्या एसीपी साहेबांना आणण्याची कामगिरी करणाऱ्या स्टाफसाठी होती. स्टाफमध्ये अधिक्षक,उपाधिक्षकआणि चार शिपाई यांचा समावेश होता. अधिक्षकांनी दोघा शिपायाना ,छानसा फुलांचा बुके अणण्यास पिटाळले.उर्वरित स्टाफ  अधिक्षकांचे मागे चालत-चालत मुख्य प्रवेश द्वारातून  फ्लॅटफार्म क्र.१ वर पोहचला. नवे एसीपी नक्कीच रिझर्व्हड कुपेतून येणार असा अंदाज करून ,अधिक्षकसाहेब रिझर्व्ड कुपे थांबतात,त्या ठिकाणी जावून उभे राहिले.त्यांना फार वेळ वाट पहावी लागली नाही. कोल्हापूरहून येणाऱ्या रेल्वे गाडीचे डिझेल इंजिन धाड ऽ धाड् करीत रुळावरून आले.रेल्वे फ़लाटावर अगोदरच असलेल्या अवांछनीय वासात ,त्याने डिझेलच्या वासाची भर घातली̮.लाऊड-स्पिकरवरून घोषणा दिल्या जात होत्या.इंग्रजी,मराठी,हिंदी भाषेत काय,काय सांगितले जात होते,पण कानाला नीट काही ऐकू येत नव्हते.  ड़ब्यातून बाहेर पडणारी माणसे आणि डब्यात नव्याने शिरणारी माणसे परस्परावर ओरडत होती.रेल्वे- हमालांची लगभग चालू होती.

हे सर्व चालू असतानाच ,या गर्दीचा भाग असलेले,पण स्वत:ला वेगळे समजणारे पोलिस अधिक्षक सुभानराव ,त्यांच्या नव्या एसीपी मनोहर यांची छबी कशी ओळखावी,अशा पेचात पडले होते.कारण रिझर्व्हड डब्यातून बाहेर पडणाऱ्या ,माणसामध्ये एकही 'ड्रेसवाला' दिसत नव्हता.त्यांच्या शोधक नजरेला ,त्यांनी बुके आणण्यासाठी पिटाळलेले दोन शिपाई दिसल्यावर ,त्यातल्या त्यात बरे वाटले.'बुके' चांगलाच भक्कम,डोळ्यात भरणारा होता.बुके घेवून दोनही शिपाई सुभानरावाजवळ आले.परंतु नवे एसीपी  मनोहर यांचे दर्शन झाले नाहीच.मग रिझर्व्हडचे सर्व डबे पडताळून झाले.तरीही नवे एसीपी यांची छबी दिसली नाही.मग बहुतेक नव्या सायबांचे येणे रद्दच झाले असावे किंवा त्यांनी त्यांची येण्याची कांही स्वतंत्र व्यवस्था केली असावी,असा विचार करून सुभानरावानी कमीशनर ऑफिसला फोन लावला.''गाडी आलीय̱. गाडी येण्यापूर्वीच फलाटावर पोहचलो होतो,पण नवे एसीपी---'' त्यांचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच कमीषनरसाहेबांनी त्याना सांगितले,''एसीपी मनोहर येथे कधीचेच पोहोचलेत.तुम्ही या इकडे .''अन् फोन कट झाला.

सुभानराव एकदम नाराज झाले. नव्या साहेबाना रेल्वे स्टेशनावर आणायला जायचे,प्रथम भेटीतच त्यांच्यावर इंप्रेशन-छाप टाकायची,आपल्या ग्रुपमध्येच त्यांना घ्यायचे इ.त्यांचे मनसुभे सध्या तरी मनातच राहून गेले.बरोबर आणलेल्या,बाकीच्या स्टाफला ,''एसीपी मनोहर  ऑफिसात पोहचलेसुद्धा !चलो ऑफिस.'' असे म्हणून ते भरभर चालत मुख्य प्रवेश्द्वारातून बाहेर आले.थोड्या अंतरावर ऍम्बॅसीडर उभी होती.तिच्या मागे जीप.दोनही गाड्यांचे ड्रायव्हर ''साहेबांना घेवून येणाऱ्या यामंडळींची वाट पहातच होती. ही मंडळी दृष्टीस पडताच ते दोन्ही ड्रायव्हर आपापल्या गाडीमध्ये शिरले.क्षणभरातच त्या दोन्ही गाड्या सुभानरावांपुढे येवून थांबल्या‌ सर्व जण येताना जसे बसले होते,तसेच स्थानापन्न झाले‍.जीपमध्ये मागे बसलेल्या शिपायांच्या हातात,त्या बुकेचे ओझे मात्र वाढले होते

                  *                                       *                                            *                                        *

कॉलेजकुमारासारखा वाटणारा मनोहर ,रेल्वे गाडी फलाटावर थांबताच पटकन खाली उतरला.त्याचेकडे फार सामान नव्हतेच.खांद्यावर अडकविता येईल,अशी एक हलकी बॅग आणि मध्यम आकाराची एक सुटकेस घेवून स्टेशनाबाहेर पडताना,त्याला मुळीच त्रास वाटला नाही.तो स्टेशनाबाहेरील रिक्षा स्टॅंडवर आला;सुटकेस रिक्षात ढकलली नि आत बसत रिक्षाड्रायव्हरकडे पहात त्याने म्हटले,''पोलिस कमीशनर ऑफिस ''

    रिक्षा सुरू झाली.ती ससूनऱ्हॉस्पिटलच्या दिशेने जाऊ लागली,तेंव्हा मनोहर रिक्षा चालकाला म्हणाला,''आपण 'अलंकार चौकातून का जात नाही ? '' रिक्षा चालक थोडा चपापला.पॅसेंजर पुण्यात नवीन नाही, हे त्याला समजले. तो सावरून एव्हढेच म्हणाला,''अलंकार चौकात सिग्नल लवकर मिळत नाही.आंबेडकरांच्यापुताळ्याच्या अलिकडून गेल्यावर सोपे पडते.''त्यावर मनोहरने काही शेरेबाजी केली नाही.पण रिक्षा चालकानेच विचारले,''पास-पोर्टच्या कामासाठी काय ?''मनोहरने क्षणभर विचार केला व म्हटले,''हो.''...''माझा एक मित्र आहे तेथे̮. लगेच काम करून देईल.फक्त एक हजार घेतो.''...इति रिक्षाचालक. ''एव्हढे ?'',मनोहरने इंटरेस्ट दाखविला.''मी माझा माणूस आहे,म्हणून सांगतो.पाचशे द्या !''...रिक्षावाला. ''अशी दररोज किती गिऱ्हाइके नेतोस,त्याच्याकडे ? त्याचे नाव सांग मला !'' ''हे बघा ,तुमचे काम लवकर व्हावे,म्हणून मी सांगितलें.नको असेल तर राहिले.''रिक्षाचालक.म्हणाला. एवढ्या वेळात रिक्षा कमीशनर ऑफिससमोर आली.मिटरवरील आकडा पाहून ,१०रू,असे रिक्षाचालकाने म्हटले.मनोहरने खिशातून १०रुपयाची नोट काढून त्याला दिली.रिक्षेच्या बाहेर उतरून त्याने सुटकेस बाहेर ओढली व ती घेवून तो ऑफिसमध्ये प्रवेश करता झाला.

                      *                                       *                                                 *                                           *

''आपणाला मदत हवी आहे काय?'' अशा पाटीखाली बसलेल्या पोलिसापुढे जावून ,मनोहरने त्याच्याकडील एक कागद दाखविला.कागद हातात घेवून ,डोळ्यावरचा चष्मा नीट करून ,त्यामध्यम वयीन ,ढेर पोट्या पोलिसाने तो कागद वाचला अन् विजेचा झटका बसल्याप्रमाणे तो ताठ उभा राहिला.त्याने जमला तसा 'सॅल्यूट'केला.त्याने त्याला जवळपास दिसलेल्या दुसऱ्या एका शिपायाला जवळ बोलावले व मनोहरकडील बॅग घ्यायची ऑर्डर दिली.योगायोग चांगले असावेत;त्यामुळेच नव्या एसीपी ना आणण्यासाठी गेलेला सुभानरावांचा जथा तेथे पोहचला.मनोहराने दिलेला कागद सुभानरावाकडे पोहचला‌. सुभानरावाची नजर त्याकागदावरून फिरली मात्र अन् त्यांच्याबरोबर असलेल्या सर्वानी खाडऽखाड असा बुटांचा आवाज काढत कडक 'सॅल्यूट'केला.मग त्या 'बुके'चे ही सार्थक झाले.''वेलकम् सर!'' असे म्हणून सर्वानी स्वागत केले.

                        *                                         *                                                 *                                          *

त्यानंतरच्या एक आठवड्याभरातच पुण्यातील साऱ्या प्रमुख वृत्तपत्रातून एक वृत्त प्रसिद्ध  झाले,ते असे होते.

पुणे.दि.+++:येथील पोलिस कमीशनर कार्यालयात पासपोर्टसंबधी चालणारा भ्रष्टाचार करणारे लिपिक व त्याला मदत करणाऱ्या कार्यालयाबाहेरील व्यक्तींची टोळी पकडण्यात यश आले असून,याबाबतचे चातूर्य दाखविणाऱ्या व पोलिस सेवेत नवीनच दाखल झालेल्या एसीपी मनोहर यांचे जनतेकडून भरभरून कौऊक होत आहे.

                           *                                             *                                               *                                       *

       पुढे चालू...

एसीपी मनोहरकडे ,कमीशनरसाहेबांनी,लगेचच स्वतंत्र कामगिरी सोपविली नाही.ते मनोहरला म्हणाले ,''तुम्ही काही दिवस,फक्त बघत रहा.पुण्यातून आणि पुणे जिल्ह्यात पाहिजे ,त्यागावी जा.आपल्या खात्यातील लोकांशी परिचय करून घ्या.अजून तुम्ही बॅचलर आहात.तेव्हा तुमच्यापेरेंटना घेवून या.याजिल्ह्यात ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाची बरीच स्थळे आहेत,ती दाखवा त्याना! ड्युटी तुमच्यामागे आयूष्यभर लागणारच आहे.''त्यामुळे एसीपी मनोहर म्हटले तर साऱ्या पुण्याचे,पुणे जिल्ह्याचेच एसीपी झाले होते.मनात येईल तसे ,वेळो अवेळी कुठे ही हिंडू लागले.̮लवाजमा त्यांच्याबरोबर नसेच‌.सरकारी वाहन न वापरता ,ते बस,रिक्षा,वडाप करणाऱ्या खाजगी  गाड्या यांच्यामधून प्रवास करायचे‌. साध्या वेशात त्यांचा संचार चालू असे.त्यामुळे त्याना अधिकृत पोलिस अधिकारी म्हणून मिळाली असती,त्यापेक्षा जास्त माहिती व अनुभव मिळू लागला होता. हॉटेल्स्,लॉजआणि ढाबे यामधून चालणारे गैरप्रकारांचा वास,त्यांना लगेच येई‌. शहरातील बसेस आणि एस.टी.‌स्थानकावर्रील चोर,भामटे व खिसेकापू यांचा ही त्यांनी धांडोळा घेतला.पोलिसांशी त्यांची असलेली हातमिळवणी समजल्यावर एसीपी मनोहरला धक्काच बसला.

         एक दिवस अचानक कमीशनरसाहेबांकडून त्यांना  बोलावणे आले.एसीपी मनोहरने आपल्या भटकंतीतील काही अनुभवाचे,निरिक्षणाचे टिप्पण तयार केले होते.त्यातील काही महत्त्वाच्या बाबीबद्दल  चे टिपण त्यांनी बरोबर घेतले व त्यांनी कमीशनरसाहेबांचे केबीन मध्ये प्रवेश केला. ̱घरातून बाहेर पडल्यावर त्यानी श्रीमंत दगडूशेठ गणेशाचे दर्शन केलेले होते. अंगारा व प्रसाद बरोबर घेतला होता.कमीशनरसाहेबांची गणेश भक्ती त्याना ठावूक झाली होती.त्यांच्यासमोर अंगारा व प्रसादाची पुडी ठेवली.एक सॅल्यूट केला.‌साहेबांनी त्याना हाताने समोरच्या खुर्चीवर बसण्याचा इशारा केला.    

     मनोहर यांनी खुर्चीवर बसत बसत एक फाईल त्यांच्या पुढ्यातील टेबलावर ठेवली. साहेबांनी ती फाईल स्वत:कडे ओढून घेतली, व म्हणाले,''तुमचा काही विशेष कार्यक्रम