हे काय नशीबी आले हे भाग्य हे असले कसले
बघ निघून गेले वजीर राजे डावपेचही फसले
मी डोळे उघडून बघतो तेंव्हा रात्र पुन्हा उलगडते
या अंधाराने हात ओलसर दिशादिशांना पुसले
बहार माझा बघता बघता काल सुकोनी गेला
फूल एकटे हाती उरले तेही पण हिरमुसले
डोळे मिटता स्पर्श कुणाचा झाला डोक्यावरती
उग्र विषारी सर्प दुतोंडी जागोजागी डसले
सोबत होते, तेही गेले निघून दुसऱ्या वाटे
चाहूल कसली, जाळीमध्ये काय पुन्हा खसफसले
पाठ फिरवुनी चालू लागलो आयुष्य चुरगाळोनी
शरीर सोबत, फिकीर कोणा, असले किंवा नसले