पूर्ण मी फुलणार आहे

पूर्ण मी फुलणार आहे

आतला रस गवसला

मूक माझ्या भावनांतून

शब्दघन हा बरसला

कुंभ काठोकाठ झाला

स्वत्व कोणा मी कथू?

आतुनी अव्यक्त सारे

व्यक्तुनी जाई उतू

स्वरूपातच अरूपाचे

रूप बघण्या आर्त मी

अमूर्ताची मूर्त आणि

अरूपाचा अर्थ मी