बरा वागतो जमेल तेंव्हा
खरे बोलतो जमेल तेंव्हा
हवे सर्व ते घरात आहे
तरी चोरतो जमेल तेंव्हा
असे चूक सर्वथा तरीही
तिला भेटतो जमेल तेंव्हा
मला माळ ओढणे जमेना
फुले वाहतो जमेल तेंव्हा
कसा आज झोपडीत देवा?
"म्हणे राहतो जमेल तेंव्हा"
खुळी जिंदगी सुसाट धावे
कधी गाठतो जमेल तेंव्हा
--------------------------------------------------
जयन्ता५२