नायिका : | सुंदर किती ऋतू हा - नि प्रवास छान आहे५ |
नायक : | सुंदर असे सहचरी - हे ऋतुलाहि भान आहे६ ।ध्रु। |
नायक : लाभे न स्थैर्य जगती - जर एकटा प्रवासी
जोडी जमे तर मनी - येई तिथे निवासी१
जुळता मने, वनहि ते - मग घरसमान आहे ।१।
सुंदर असे सहचरी - हे ऋतुलाहि भान आहे
नायिका : | मजला कळे न वारे - हे काय सांगू पाहे२ तव साद पाखरा रे - हे काय सांगु पाहे? कसला प्रभाव सारे - भारून रान आहे?३ ।२। |
नायक : | सुंदर असे सहचरी - हे ऋतुलाहि भान आहे |
नायक : सांगत निसर्ग आहे, - हृदयास हृदय जुळु दे४
घेऊन प्रेमऊर्जा - हृदयी दिवा उजळु दे
प्रीती विशुद्ध, तेथे - न भयास स्थान आहे ।३।
सुंदर असे सहचरी - हे ऋतुलाहि भान आहे
टीपा :
पर्याय:
५. यात्राहि छान आहे
६. हे ऋतुलाहि ज्ञान आहे ... किंवा ... ही ऋतुलाहि जाण आहे
१. जर युग्म, तर निवारा - येई जिथे मनासी
२. न कळे मला, पवन हा - हे काय सांगु पाहे
३. घडलेय काय हे जे - भारून रान आहे? ... किंवा
काहीतरी असे जे - भारून रान आहे. ... किंवा
साऱ्यावरी कशाची - ही खूणखाण आहे?
४. सांगे निसर्ग, हृदया - हृदयास भेटवावे
घेऊन प्रेमऊर्जा - हृद्दीप पेटवावे
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
चाल : मूळ गाण्याचीच! (गागालगालगागा - गागालगालगागा (आनंदकंद? )) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल ). एक मुद्दा : ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीत ह्या दोन भागांच्या मध्ये एक 'गा' जास्तीचा आहे. गागालगालगागा - गा गागालगालगागा (भाषांतरात तो सोडलेला नाही
)
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)
३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक आन आहे असे जमवा बरका ! ( ... आण आहे असेही चालेल. मात्र ध्रुवपदाच्या दुसऱ्या ओळीतला तो मधला जास्तीचा 'गा' सोडू नका हां )