हाताच्या तळव्याएवढ्या टक्कल असलेल्या गृहस्थाच्या तोंडून शब्दाने तिरकी उडी घेतली ,
"काग्र्याच्युलेशंस !"
बंडोजी धिल्लम मिणमिण हसत म्हणाला ,
"अभिनंदन !!"
गालाला मूठभर खड्डा असलेला गृहस्थ नुसताच हसला
लक्षच नव्हते त्याचे .कणाकणाने गहाळ होत जाणारे भान .म्हणजे आपण आपल्या ह्या प्रचंड धान्य गोदामात
एकटेच आहोत .आपल्या एका सहकार्याने दांडी मारली आहे .आणि काम नसल्यामुळे एकजण पसार झाला आहे.
हे सारे तो विसरून गेला होता नि खुर्चीवर सैलपणे पसरून कसलातरी विचार करीत होता कदाचित काहीतरी आठवण्याचा प्रयत्न करीत होता
आणि हे करीत असताना अपरिहार्यपणे त्याचे भान गहाळ होत होते.
मग पंधरा सेकंदात त्याला बरेच काही जाणवले हरवलेले भान परत आले. तो मिणमिण हसला मग त्याने धिल्लमकडे पाहत एक डोळा मिचकावला
गालाला मूठभर खड्डा असलेल्या गृहस्थाकडे बघून प्रश्नार्थक चेहरा केला कोऱ्या चेहऱ्याने कोन्ग्राच्यूलेशन करणाऱ्या गृहस्थाकडे पहिले .विचार टपकला !
गृहस्थाचे टक्कल बरेच बाळसेदार बनत चाललंय हात फिरवायला ...ह्या ..आणि हे बडोजी धिल्लम ह्यांनी व्यायाम करायला हवा कमीतकमी योगासने
ह्यांचे म्हणजे दमादम खाणे नि....!!
त्याने तिघांकडे रोखून बघितले .मग हसून गबाळेपणाने म्हणाला ,
कशाबद्दल ...कशाबद्दल अभिनंदन ?
हाताच्या तळव्याएवढे टक्कल असलेला तो धूर्त गृहस्थ डोळे विलक्षण बारीक करीत म्हणाला ,
"एस.दि.सराफ आपणच ना?"
तो माफक हसून म्हणाला ,
"माहीत नाही बा हरवलाय की काय?"
बंडोजी धिल्लम लुच्चेपणाने म्हणाला ,
"मासिक चाळता चाळता आपले नाव दिसले
मग थांबून हळुवारपणे म्हणाला
"कदाचित ते नाव आपलेच असावे ! आपलेच ना ?-अभिनंदन !
टक्कल असलेला गृहस्थ दिलखुलासपणे म्हणाला ,
"अभिनंदन लेखक महाशय ..!!"
गालाला मूठभर खड्डा असलेल्या गृहस्थाने नुसतीच गालातल्या गालात जीभ घोळवली नि हात पुढे केला
अभिनंदन स्वीकारता स्वीकारता तो मिणमिण हसत म्हणाला ,
"बस काय घेणार ? चहा ? कॉफी? ..
तिघांचे रिकामे चेहरे बघून तो हसला म्हणाला ,
"माझ्या तीन मित्रांना मला वाटते चहाच आवडेल ? नाही..?
तिघांनीही एकमेकाकडे आळीपाळीने चोरून बघितले बंडोजी धिल्लमने खिशातून रुमाल काढला
भाळावरचा घाम पुसत म्हणाला ,
ह्या ...काय उकडतेय ब्वा .....!
करकरीत टक्कल असलेला गृहस्थ म्हणाल ,
"मला वाटते शंभर वर्षाचे रेकार्ड तोडलेय घाम नुसता घाम ....!!
गालाला मूठभर खड्डा असलेला गृहस्थ नुसताच हसला
ऑफिस प्यूनला बोलावून त्याने गोल्ड-स्पॉट मागविला .तिघांचेही चेहरे जी भरके जीयोच्या उत्साहाने भळभळून फुलले
गोल्ड स्पॉट चवीने पिणं झाल्यावर टक्कल असलेल्या गृहस्थाने खिशातून सिगारेटचे पाकीट काढले .प्रत्येकाच्या
पुढ्यात धरीत म्हणाला
"ह्याव अ सीगार... ?
त्याच्यापुढे जेव्हा पाकीट धरले तेव्हा तो हसून म्हणाला ;
"नो थ्यांक्स ...!!
टक्कल असलेला गृहस्थ दचकून म्हणाला ,
नाही ओढत सिगारेट ..? अहो एवढे लिहिता आणि ...जो लिहितो त्याला खाणे पिणे ...ओढणे .अनुभव हवाच काय ..?
बंडोजी धील्लम नाकातून धूर सोडीत म्हणाला ,
"कमीतकमी सिगारेट तरी ?"
टक्कल असलेला गृहस्थ ओठाकडे अंगठा करून खाजगी स्वरात म्हणाला ,
म्हणजे हा अनुभव शून्यच म्हणायचा ....???"
बंडोजी धील्लम जाभाड पसरीत म्हणाला ,
"अरे बाबा ,अनुभव हा हवाच .जाऊया एके दिवशी एखाद्या आडवाटेच्या गल्लीत .?बाहेरून सुनसान सामसूम .
अगदी मुठीयेवढी खोली आडवी तिडवी पसरलेली दोन तीन बाकडे .मध्ये कळकट टेबल .त्यावर पडलेला एखादा फुटकां ग्लास
आजूबाजूच्या भिंतीवर हव्या त्या देवांची साक्षीदार चित्रे ...."
बंडोजी धील्लमने त्याच्याकडे एकदा बघून घेतले .मग हसून म्हणाला ,
"अरे बाबा कोण म्हणतोय प्या म्हणून ?कमीतकमी आमच्या बरोबर तर चला .बघा तिथले वातावरण एखादे सुचले कथानक तर घ्या खिशात घालून ..."
टक्कल असलेल्या गृहस्थाने एक जोरदार झुरका घेतला नि सिगारेटचे थोटूक खाली ठेवून त्याला बुटाने ठेचून काढीत म्हणाला
काही म्हणा मिस्टर सराफ अनुभव हा हवाच .आता तुमची कथा वाचली तशी बरी आहे .पण तीच वरण भाताची ..!!ह्यात नवीन ते काय ..?
अठराशे सत्तावन्न पासून हेच घडतंय की राव ?अरे,जरा बाहेर भटका हवे तर फूटपाथच्या कानाकोपऱ्यावर बसणाऱ्या भिकाऱ्याशी गप्पा मारा
अरे जाम अनुभव मिळतो .नुसतेच विल्यम फोक्नेर काय वाचता ..?
गालाला मूठभर खड्डा असलेला तो गृहस्थ काहीसा खिन्नपणे हसला .
मग थोडेसे थांबून विचार करून बोलू लागला ,
"अनुभव काय कोठेही मिळतो .जरासे सावध असा म्हणजे झाले
आता माझ्या गालाचा खड्डा घ्या चांगला मूठभर आहे.पण कोणी कधी विचारलाय का ?-कारे बाबा हा खड्डा कसला आहे.
कमीतकमी लेखक महाशय तुम्हीतरी कधी विचारायचे होते ?नसता मिळाला एखादा अनुभव यैकायाला ?मला वाटते
आपणा सर्वांची ओळख होऊन चार-पाच महिने झाले असावेत आपण इतके भेटतो बोलतो .तुम्ही फक्त खड्ड्याकडे बघता -
लक्ष असते माझे .-पण काही विचारीत नाही ...!
मग काहीसा थांबून सर्वावरून नजर फिरवून म्हणाला ,
"आतातरी कोणी विचारणार आहे का ?"
त्याने हळूच त्याच्या गालावरच्या खड्ड्याकडे बघितले .मग त्याला जाणवले की,तो खड्डा कानाकडे सरकत सरकत कानाकडे उतरला आहे.
बंडोजी धील्लम म्हणाला ,
"कसला ?..कसला खड्डा आहे ?"
टक्कल असलेला गृहस्थ हळुवारपणे म्हणाला ,
"कुणाच्या भावना दुखवाव्या हे मनात नसल्यामुळे नाही विचारले .!कळेल आता? सांगाल?
तो संथपणे म्हणाला
"कसले ऑपरेशन वगैरे ?"
गालाला मूठभर खड्डा असलेला गृहस्थ निर्विकारपणे म्हणाला
" कॅन्सर..!कॅन्सरचे ऑपरेशन ?"
सर्वजण प्रचंड दचकले .सारे वातावरण क्षणभर गोठल्यागत झाले
तो भिजल्या स्वरात म्हणाला ,
"केव्हा ..?कधी झाले ऑपरेशन ?
गालाला मूठभर खड्डा असलेला गृहस्थ मिणमिण हसत म्हणाला ,
"दहा वर्षापूर्वी .डाक्टर म्हणतात तू पूर्ण वाचला आहेस .आणि मी अजून जिवंत आहेच की ?"
मग तपशीलवार माहिती सांगून गालाला मूठभर खड्डा असलेला गृहस्थ म्हणाला ,
"उजव्या बाजूच्या खालच्या हिरडीला झालेला कॅन्सर कापून काढताना त्याची मुळे खोलवर सरकलेली डाक्टरला दिसली
मुळाचा शोध घेत घेत डाक्टरच्या तेज सूर्या खांद्यापर्यंत येऊन थडकल्या ....!!
एवढे बोलून गालाला मूठभर खड्डा असलेला गृहस्थ थांबला मग चटकन त्याने आपल्या शर्टाची बटणे सोडवून घेतली नि आपला मोकळा खांदा दाखविला
खांद्यावर ओपेरेशनच्या शिळ्या खुणा अजूनही जिवंत होत्या ...
गालाला मूठभर खड्डा असलेल्या गृहस्थाचा जीवघेणा अनुभव ऐकून तो गुदमरून गेला .मग ते तिघे अदृश्य झाले .
ते कधी गेले ,जाताना आपण त्याच्याशी काय बोललो हे त्याला काही केल्या आठवेना ,खुर्चीवर सैलपणे पसरल्यावर
त्याला एकाच जाणीव होत राहिली की आपल्याही जबड्याची हाडे कोणीतरी कापतो आहे आणि आपली गालाला मूठभर खड्डा पडतो आहे ....!!