कधी कधी ...

कधी कधी हा विचार माझ्या मनामधे येतो
की देवाने तुला जणू निर्मिलेय मजसाठी
आधी तू तारकांत राहायचीस कोठेशी
तुला धरेवर बोलावुन घेतलेय मजसाठी
कधी कधी ...

कधी कधी हा विचार माझ्या मनामधे येतो
की ही तनु अन् हे कटाक्ष ही माझी ठेव असे
गर्द सावली ही केसांची आहे मजसाठी
तुझे ओठ हे अन् हे बाहू माझी ठेव असे
कधी कधी ...

कधी कधी हा विचार माझ्या मनामधे येतो
की जीवनभर तू आकांक्षिल मज असेच ऐसे
प्रेमनयन मजकडे वळावे तव असेच ऐसे
परकी तू कळते परि वाटे ते असेच ऐसे
कधी कधी ...

कधी कधी हा विचार माझ्या मनामधे येतो
की जणु भवताली सनई-स्वर-किमया भरलेली
मीलनरात्री तुझा पदर मी जरा उचललेला
लाजुन फुलून अन् तू माझ्या मिठीत शिरलेली
कधी कधी ...

टीपा :

१. असेच ऐसे असे का म्हणावे वाटले असेल ? ह्या मागे काही हेतुअसेल की आपले असेच ऐसे ?! ह्या ओळींंचे भाषंतर कठीणगेले पण ह्यामुळे आण्खी चांगले भाषांतर करण्यासाठी लोक पुढे येतील ह्या हेतूने ते असेच ऐसे सोडलेले आहे; उगाच असेच ऐसे नाही

दुसर्या आणि चौथ्या ओळीत गाण्याची यमके आहेत. ठेका नीट जमण्यासाठी

गा गा गा गा । गा गा गा गा । गा गा गा गा । गा ... अशा पद्धतीने गा !

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेलेआ काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.)