ऊस आंदोलनावरून मनात विचार आला की आपण गूळ खाणे का सोडले आहे?
ग़ूळाचे उपयोग:
१) पाहूण्यास गूळ व शेंगदाणे देत
२)ग़ूळ खोबरे नैवैद्य म्हणून
३) वरणात उपयोग
४)ग़ुजराती जेवणात शेवटी गूळ देतात
५) गुळांबा करण्यासाठी वगैरे
परंतु हल्ली आपण गूळ खाण्याचे का सोडले आहे? हल्ली सर्व तिखट पदार्थ जसे वडा पाव,सामोसे वगैरे खातात.
खूप वेळा तिखट खाल्ल्यावर गोड खाण्याची इच्छा होते.पण तेथे गूळ का उपलब्ध नसतो? लहान मुले हॉटेलमधे
तिखट खावून रडतात.त्याना गूळ का देत नाही.पन्जाबी खाण्याचा आपल्यावर एवढा प्रभाव का पडला आहे?
तिखट खाल्ल्यावर माणसे गोड वागतील की गोड खाल्ल्यावर?गोड खायला न देता गोड वागण्याची अपेक्शा
दुसर्याकडून कशी करता येईल?ग़ूळ स्वस्त असून का वापरत नाही?