विदर्भातली मराठी भाषा - भाग ३

हे घ्या अजून काही विदर्भीय शब्द आणि वाक्प्रचार:

शब्द :

  1. अंगारपेटी = काडेपेटी
  2. शष्प = पालेभाज्यांचा पाने काढल्या नंतर उरणारा टाकून देण्याचा भाग
  3. चिमणी चे तेल = रॉकेल
  4. तोंडाचे चवणे = जीभेचे चोचले
  5. फोतरं = टरफले
  6. माकोडा = मुंगळा/डोंगळा
  7. आसणीच्या घासणीवर = स्वत: च्या मर्जीने कुठेही कसेही
  8. विस्कट-वास्कट/ विस्कळ-वास्कळ = अस्ताव्यस्त
  9. हागोडं काम = अर्धवट काम
  10. आळशी ढोणी = खूप आळशी
  11. फकडी = फुलपाखरू
  12. रपसप = मजबूत/ दणकट
  13. मरतांगडं = मरतुकडं
  14. मांजोळी = रांजणवाडी
  15. ओंगळ = ओघळ

वाक्प्रचार:

  1. पाटपाणी करणे = जेवायला बसण्याची पूर्वतयारी करणे
  2. लेडंबेडं होणे = लडबडणे
  3. लोळती वळणे = जीभ टाळ्याला चिकटणे (बोलती बंद होणे)
  4. ओलंगट्टं होणे/ ग़टग़ट ओले होणे = खूप ओले होणे
  5. कानांत भेंडं जाणे = काहीच ऐकू न येणे
  6. थुक्याला थुका लावणे = काम नीट न करणे
  7. फणकी सारखी नाचणे = आकांडतांडव करणे
  8. डोळा पाणी हाणणे = डोळ्यातून पाणी येणे
  9. लसूण निसणे = लसूण सोलणे
  10. लगर लगर करणे = घाई गडबड करणे
  11. डुल राहणे = खाऊन पिऊन खुशाल राहणे
  12. पोटात खलंलंलं होणे = खूप भूक लागणे