प्रीतिची रीत

प्रीतिच्या रीतीस ह्या, पूर्तीस मी न्यावे कसे?
आग पेटे भोवती, पदरास रक्षावे कसे?

रोखण्याला मार्ग हृदयाचे, उभ्या करती जगी
मज कुणी सांगा कि, त्या भिंतींस पाडावे कसे?

स्फुरति गाणी शेकडो दुःखात बुडलेली जरी
तार हृदयाचीच तुटली आज, मग गावे कसे?

भार दुःखांचाच असता, वाहिला असताहि तो
भार हे आयुष्य होता, त्यास वाहावे कसे?

चाल :

गालगागा गालगागा गालगागा गालगा

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत. (मागच्या खेपेला काही लोकांचा गैरसमज होऊन त्यांनि विनंती करून सुद्धा व्यनितून उत्तरे पाठवली.  )

३. प्रशासक, प्लीज, मागच्या वेळेप्रमाणेच बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )