अड्मीट कीडा ...किसका घर

मध्ये ऐका रविवार पुण्यात घरी असताना खूप आरडा ओरडा ऐकू आला म्हणून बाहेर नजर टाकली..तर ऐक 10 12 वर्षाच्या  मुलांचा ग्रुप दंगा करत पळापळी करताना दिसला. आधी मला वाटला ते नेहमीसारखा क्रिकेट खेळात असावेत...पण नंतर बघितला तर ते लोक चक्क बेसबॉल खेळत होते ...आता या खेळच नियम वगैरे मला माहीत नाहीत.. आणि खरंतर मला हा खेळ अजिबात आवडत नाही...पण एकुणात जे दिसला त्यावरून एवढा नक्की की त्या मुलांना हा खेळ चांगलाच माहीत होता आणि ते अगदी मनसोक्त खेळत होते ...हा प्रसंग मला ऐक सौम्य धक्का देऊन गेला ...कारण पुण्याच्या गल्लीबोळात एवढी छोटी मुला बेसबॉल खेळत होती हेच मला विशेष वाटला.....
आणि उगाच आठवत राहिलो की या  वयाचे असताना आपण काय खेळायचो......
माझ्या लहानपणी आम्ही  ऐका मोठ्या वाड्यात राहायचो आणि तिकडेच हे सगळे "मैदानी" खेळ चालायचे .... आता आमच्या वाड्यातल्या जागेला मैदान म्हणणं म्हणजे बॅडमिंटन कोर्ट ला फुटबॉल ग्राउंड म्हणण्यासारखा आहे ....पण तो भाग अलाहिदा ..!

 संध्याकाळी शाळेतून घरी आल्यावर दप्तर एकदा घरात टाकली की सगळी मुला ऐक ऐक करून वाड्याच्या अंगणात जमायची....खेळाची सुरवात व्हायची ती सगळ्यांच्या गलक्यान ....या मध्ये वय वर्ष 7 ते 14 मधली सगळी प्रजा आपला मत हिरीरीने मांडायची.... की कुठला खेळ खेळायचा....
आणि मागच्या आठवड्यात कुठल्या दिवशी काय खेळलो इत्यादी गोष्टींचा  प्रचंड उहापोह होऊन ऐक कुठलातरी खेळ ठरायचा .......जर का आदल्या दिवशीचा खेळ अंधारामुळे किंवा अन्य काही कारणामुळे अर्धवट राहिला असेल तर आदल्या दिवशीच्या खेळाडूवर परत राज्य यायचा ......कोणत्या खेळाडूवर राज्य आहे हे ठरवण्यासाठी ऐक पद्धत असते त्याला आम्ही कचणे म्हणायचो.. काही लोक त्याला छापा पाणी म्हणतात ... खूप लोक असतील खेळायला तर ऐक काहीतरी गाणं म्हणून आता मला जे आठवत नाही....पण निळी शाई आम्ही कुणाला भीत नाही अशी काहीतरी सुरवात होता एवढं आठवत आहे ....या पद्धतीनं राज्य ठरवायचो ..नाहीतर मग तीन यामध्ये तीन लोक एकमेकांचे हात धरून  ऐक दोन तीन म्हणत ऐकच वेळी एक हात स्वतःच्या दुसर्‍या हातावर उलटा अथवा किंवा सुलटा आपटायचे ...जर का सगळ्यांनी उलटे हात ठेवले तर परत कचायचे ..नाहीतर तीन पैकी ज्या आणि माणसाची टाळी ..म्हणजे उलट किंवा सुलट ...बाकी दोघांपेक्षा वेगळी असायची तो सुटलऽ... मग पुढचा  माणूस येऊन परत तिनाचा गट.. .असे करत करत जो माणूस शेवटी राहील त्याच्यावर राज्य यायचं....शेवटचे दोन लोक राहिले की आधी सुटलेल्यातलाच एक जण कचायला यायचा ..तो आधीच सुटला असल्यानं तो फक्त उरलेल्या दोघांमधला कोण राज्या घेणार हे ठरवण्यासाठी मदत करायचा..याला आम्ही 'पाणी देणं'   असा म्हणत असू ..पण जर का कोणी नवीन खेळाडू खेळ सुरू आल्यावर खेळायला येत असेल तर त्याच्यावर 'नवा गाडी नवा राज्य'  येत असे

क्रमशः