तर त्यात गैर ते काय? (उत्तरार्ध)

ह्या साहित्यिक राजकारणाच्या शेणात वळवळणाऱ्या किड्यांना एकच सांगायचे आहे की, माझी लोकशाहीच्या ढाच्यात निवडणुकीला ना नाही. पण हे प्रतिष्ठा जपून (पणाला न लावून) करता आले असते, मतदारांना एक साधे पत्र पाठवून मत देण्याची विनंती करता आली असती, चिखल फेकेची काय गरज होती?

नाट्य, साहित्य आणि कवी संमेलने सगळी कडे हीच बोंब.

मला तर वाटते ही अध्यक्ष पदे खूपच 'मलईदार' आणि 'अर्थपूर्ण' असणार, वर गण गोतावळ्याचे पण कल्याण (हलवायाच्या घरावर तुळशीपत्र..) करता येत असणार आणि सरकारी तुकड्यांचे चामडे लाळ गाळत चघळता येत असणार.

आता वाचकांचे काय मत आहे बघूयात.