... अन् मी मागे मागे

जगती ह्या - मजहुनि ना - वेड्यापरि कुणि वागे
जात पुढे - शिकारी माझा - अन् मी मागे मागे ।ध्रु।

वैरिण ही - मजसि जशी - प्रेमाजोगी भेटे
भान तसे - ना राही - वाट कुठे घर कोठे
चालत मी - झोपेत जणू - नकळे, 'डोळे निजले की जागे?' ।१।
जगती ह्या - मजहुनि ना ...

मी न मनी - आणतसे - आज उद्याच्या गोष्टी
क्षणभरच्या - गोष्टी ह्या - जीवनभरची प्राप्ती
दोन घडी - सहवास घडे - कसले जीवन जर कुणि ना संगे ।२।
जगती ह्या - मजहुनि ना ...

चाल : मूळ गाण्याचीच!  (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )  गागा गा गागा गा गागागा गा गागा (भाषांतर करताना चालीत बसेल इतपत केलेले आहे.)

विनंती :


१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. उत्तरे व्यनि तून पाठवू नयेत.

३. प्रशासक, प्लीज, बरेच जमेपर्यंत प्रतिसाद थोपवून धरा. (नाहीतर एकमेकांची बघून उत्तरे लिहतील  )

४. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा.) ... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )