आपल्याकडे राज्य परिवहन मंडळाच्या गाड्यांना (एस.टी.) 'लाल डबा' असे म्हणण्याची 'पध्दत' आहे.
ही सेवा महाराष्ट्राच्या कानाकोप-यात पोचलेली आहे. खासगी गाड्या काही विशिष्ट शहरांपर्यंत मर्यादित आहेत.
या सेवेचा लाभ अभिजनांपासून बहुजनांपर्यंत सर्वांना घेता येतो. खासगी गाड्यांतून सधन व्यक्तीच प्रवास करू शकतात.
खासगी गाड्यांचे चालक-क्लीनर व व्यवस्थापकांकडून उध्दटपणाची वागणूक मिळते. एस.टी.चे चालक-वाहक तुलनेने सौजन्यपूर्ण वागतात.
एस.टी.ची सेवा ब-यापैकी नियमित असते. खासगी गाड्यांची सेवा अनियमित असते.
खासगी गाड्यांमधील टीव्ही, मऊ सीटस् या सुविधा एस.टी देत नाही. पण काही मार्गांवर एस.टी च्या सुखद गाड्या धावू लागल्या आहेत.
एस.टी.ची भाडी तुलनेने परवडण्यासाऱखी असतात. टी.व्ही, मऊ सीटस् यांच्या पार्श्वभूमीवर खासगी गाड्या अवाजवी भाडी आकारतात.
अपघात आणि मार्गावरील इतर अडथळे यांच्यावर एस.टी व खासगी गाड्या यांच्यापैकी कोणाचेच नियंत्रण नाही. तरीपण, एस.टी.च्या चालकांना चालविण्याच्या जबाबदारीचे भान खासगी गाड्यांच्या चालकांच्या तुलनेत अधिक असते.
वरील सर्व मुद्यांबाबत काही खासगी प्रवास कंपन्यांचे सन्माननीय अपवाद आहेत.
सारांश, एस.टी. तुलनेने खूप चांगली सेवा देते. अशा एस.टी.ची 'लाल डबा' म्हणून का संभावना केली जाते ?
(ज्याला हा शब्द सुचला, त्याला एकदा भेटण्याची इच्छा आहे.)