बटाटेवडे रोहिणी पध्दती

  • बटाटे ४
  • कांदा १
  • मिरच्या ६ तिखट, लसूण पाकळ्या ४ मोठ्या, कोथींबीर १ जुडी, अर्धे लिंबू
  • डाळीचे पीठ १ वाटी, ३ चमचे मैदा, वडे तळण्यासाठी तेल
  • मीठ , साखर चवीपुरते
  • हळद, हिंग
१ तास
४ जणांना

बटाटे उकडून, त्याची साले काढुन कुस्करुन घ्यावेत. त्यात कांदा, लसुण पाकळ्या, मिरच्या व कोथिंबिर खूप बारीक चिरुन घालणे, लिंबू पिळावे. चवीपुरते मीठ व साखर घालावे, व ह्या सर्व मिश्रणाचा लगदा करावा. हे बटाट्याचे सारण तसेच कच्चे राहु देत. ( कांदा व इतर मसाला अजिबात तेलात परतून घ्यायचा नाही, कारण वडे तेलकट होतात शिवाय लसूण,मिरच्या मिक्सरमधुन बारीक करायचे नाही).

डाळीचे पीठ भिजवताना त्यात थोडा मैदा, चवीप्रमाणे तिखट,मीठ घालणे, शिवाय थोडी हळद व हिंग घालणे.  बारीक चिरलेली कोथिंबिर आठवणीने घालणे. (गरम केलेले तेल डाळीच्या पिठामधे अजिबात घालायचे नाही, त्यामुळे वडे तेलकट होतात.)

नेहमीप्रमाणे वडे तळणे.

नाहीत.