तव मुद्रेच्या गं जादूने

तव मुद्रेच्या गं जादूने
आकर्षिला जातो मी
अन्यत्र असे जरि जायाचे
तुझियाऽऽकडे येतो मी ।ध्रु।

हीरक-उज्ज्वल ही तव दृष्टी
दृष्टी करिते किती गुजगोष्टी
गोष्टींमधली ती रसवृष्टी - लावी - मज तृष्णाऽऽ प्रेमाची ।
क्षणभरही जेव्हा तू पाहत
मरणाराही व्हावा जीवित
तुझिया अधरामधले अमृत - लावी - ओढ मलाऽऽ जगण्याची ॥

पाऊल पडे तव साथीने
अडवूऽ न त्या शकतो मी ।१।
तव मुद्रेच्या गं जादूने ...

तुज मी ज्यावेळेस बघितले
बघता 'देव असे' हे पटले
पटता मम हृदयाने म्हटले, - "अससी - तू मम ठेऽऽव सुखाची" ।
'हो' म्हण तू माझ्या प्रेमाला
ने तू मजला पूर्णत्वाला
किंचितही विरह तुझा मजला -      आणी - गत पुरतीऽऽ वेड्याची ॥

दुष्प्राप्य जरी असशी, करण्या
माझीऽ तुला मरतो मी ।२।
तव मुद्रेच्या गं जादूने ...

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.

२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )