ज्योतिषी

ज्योतिष हे एक शास्त्र आहे असे सांगीतले जाते.

त्यावर माझा विश्वास फारसा नाही कारण तसे सिद्ध झालेले नाही. माणसाला कुठल्यातरी कारणाने ( मेंदूमध्ये काहीतरी असामान्य इंद्रिय कार्यरत होणे, ताऱ्यांच्या मागोव्यावरून पृथ्वीवर घडणाऱ्या गोष्टींचे भाकीत करू शकणे, कुंडली ) ज्योतिष सांगता येते हे मानायला माझी हरकत आहे. तो एक वेगळाच विषय!

इथे माझा असा मुद्दा आहे कीः

ज्योतिषांकडे खूप लोक जातात. अनेक ज्योतिषी व्यवस्थित ऑफीस थाटून बसलेले आहेत.

माझे प्रश्न!

१. ज्योतिषांना मिळणाऱ्या पैशावर उत्पन्न कर का नसावा?

२. समजा एखादे भाकीत खोटे ठरले तर त्या ज्योतिषाचा धंदा बंद करण्याची सोय का नसावी?

३. भाकीत खरे ठरल्यावरच पैसे देण्याचा अधिकार माणसाला का नसावा?

ज्योतिषांचा व्यवसाय पुर्णपणे सामान्य मानसांच्या श्रद्धेवर चालतो हे माझ्यामते अयोग्य आहे.

मध्यंतरी एका विद्यापीठाने म्हणे ज्योतिषशास्त्र असा एक विभाग काढण्याचे ठरवले होते. किती विचित्र प्रकार आहे हा! मुळात ज्योतिष शिकवण्याआ अधिकार एखाद्या शिक्षकाला आहे की नाही हेच ठरनार कधी तर त्याने सांगीतलेले भाकीत खरे झाल्यावर! बर, अनेक भाकीतांपैकी काही खरी झाली नाहीत तर त्या शिक्षकाची सनद रद्द करण्यात यायला पाहिजे, हे का ठरले नाही?