शिक्षणात हवे आहेत बदल

१. भारतात कधी नव्हे ते सध्या घडतेय व बुध्दीजीवी लोक आयुष्यात तिशीनंतर बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या स्थिर होउ लागलेत. त्यामुळे अशा लोकांच्या बाबतीत जे घडते ते म्हणजे त्यांना त्याच्या आवडीच्या अनेक गोष्टी आयुष्यात लवकर करता येतात. असे अनेक चांगले शिकलेले लोक की ज्यांना शिकविण्याची आवड असेल त्यांना शाळांतुन गेस्ट टीचर करुन तास घ्यावेत. ह्यासाठी शाळांनी जास्तीत जास्त लोकाभिमुख व्हावे. वरील बदलाचा परिणाम मुलांवर तसेच शिक्षकांवर वरही पडेल व त्यांना प्रोफ़ेशन, व इतर हजारो बाबींचा प्रत्यक्ष अनुभव मिळेल.  
२. असेच गेस्ट टीचर तुम्हाला निवृत्त शिक्षकांतही दिसतील. चांगल्या निवृत्त शिक्षकांना प्रत्येकी एक वर्ग द्यावा व त्यांनी आठवड्यातील २ ते ४ तास वर्गावर येउन सध्याच्या शिक्षकाला/ना व मुलांना मार्गदर्शन करावे. वर्ग-शिक्षकाने काही प्रश्न त्यांच्यासमोर मांडावेत; ते कोणत्याही बाबींचे असावेत- मुलांचे मोजके प्रश्न, अभ्यासक्रमाच्या अडचणी, शिकवण्याचे तंत्र, ई. त्यामुळे वर्ग-शिक्षकाचा सहभाग अनेकांगी होउन तो मुलांचा खऱ्या अर्थाने एक मेंटर, ऑर्गनायझर,  मॅनेजर होइल.  
३. स्वशिक्षणाची सवय लहानपणीच लागली तर त्याचे अनेक फायदे मुलांना तसेच पालकांना होतील. ह्यासाठी, शाळांनी मुलांना किमान १ वर्ष शाळेत न येता व घरुन अभ्यास करुन परीक्षा देण्याची मुभा द्यावी. हे जितक्या कमी वयात करता येइल तितके चांगले. मुलांना कळेल की शाळा का महत्वाची, स्वत: अभ्यास कसा करावा, स्वत: वेळेचे नियोजन कसे करावे, ई.  
ह्यावर्षात गुणांना महत्व न देता, इतर काही निकष लावावेत. ह्यात अनेक चांगल्या सवयीही लावता येतील. उदा. स्वत:चे कपडे धुणे, स्वत:ची भांडी स्वच्छ करणे, वाहतुकीचे नियम शिकविणे, इ. अशा सवयींना पालकांनी गुण द्यावेत व तो तक्ता पाल्यांना द्यावा. ह्या वर्षात असे सर्व विषय त्यांना द्यावेत की जे कोणतीही शिकवणी न लावता त्यांना शिकावे लागतील व एक बरा असा भारतीय नागरीक होण्यासाठी मदत होइल. ज्या पालकांना हा सर्व प्रकार एक डोकेदुखी वाटेल, त्याच्यासाठी वेगळे पर्याय शोधून मुळ उद्दीष्ट कसे साधता येईल ते पहावे.  
४. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी ही आपल्याकडे बीएड च्या विद्यार्थ्यांना असते की नाही मला माहीत नाही पण, जरी असली तरी, त्याच्या कोणत्या पातळीवर आपला अभ्यासक्रम असतो, शिक्षक आहेत (त्या त्या पातळीवर जाउन शिकवणारे), ते पाहता येइल व शाळेच्या अभ्यासक्रमात बदल घडवून आणता येतील. शिक्षण ब्लूम्स टॅक्सॉनॉमी  वरील पातळींवर जाण्यासाठी गेस्ट टीचरची मदत घ्यावी.
५. काही विषयाच्या परीक्षा घेउ नयेत पण नुसतेच विषय शिकवावेत. उदा. इतिहास. कारण त्यामागे आपली भावना अशी असते की मुलांना आपली संस्कृती कळावी. मग ती नुसते शिकवुनही कळेलच.  
त्यांना अशी पुस्तके वाचुन लेख लिहुन आणण्यास सांगावेत की ज्यामुळे त्यांचा अशा विषयांचा अभ्यास आपोआपच होइल. एकमेकांचे लेख त्यांना तपासायला देउन गुण देण्यास सांगावे. वाचलेला वेळ मुलांना सॉफ्टस्किल्स शिकवण्यासाठी वापरावेत, उदा प्रेसेंटेशन स्किल्स दुकानात जाउन काम करणे.  
नागरीकशास्त्र मात्र १०० गुणांचे करावे. वाहतूकीच्या नियमांबद्दल २५ मार्कांचा विषय दर वर्षी असावा.
६. सर्वाना आवड्तील अशा कला शिकवाव्यात (६४ कलांपैकी), नुसत्या गायन, वादन, नॄत्य, अभिनय अशा चौकटीमधे न राहता, मुलाना जे आवडेल ते त्यांनी शिकण्यासाठी काय करावे ते पहावे. ज्यांना गायन, वादन, नॄत्य, अभिनय, चित्रकला नाही शिकायची/चा/चे, त्यांनी काय करावे? अर्थात हे ६४ शिक्षक एकाच शाळेत असणे शक्य नाही, त्यासाठी शाळांनी रिसोर्स पूलिंग करावे.  
७. ऑऽफ पीरिअडला, तसेच आजारी मुलाने घरी बसुन (शक्य असल्यास)  काय  करावे हे नीट ठरवावे. एखादी ऐनवेळेची एक्झॅम घ्यावी व त्याचे गुण द्यावेत. असे ऐनवेळेचे पेपर आधीच तयार असावेत. शिक्षक वर्षातुन सरासरी १०% वेळा सुट्टी घेत असतीलच त्यामुळे ऑऽफ पीरिअड भरपुर असतात. थोड्याशा अधिक चांगल्या प्लॅनिंगने अशा तासांना गेस्ट टीचरना बोलवुन घेता येउ शकते.  
अशा सर्व ऍक्टिव्हिटीजसाठे शाळेची वेब साईट वापरावी (शक्य असल्यास).  
८. (निदान ५ वी पर्य़ंत तरी, नंतर कमी असे विषय असावेत) सर्व विषयांच्या कमीतकमी ३ डिफिकल्टी लेव्हल्स असाव्यात. एखाद्याला काय झेपते आहे, त्याप्रमाणे त्याला ती पातळी निवडण्याची मुभा असावी. इथे गुणांना काहीच महत्व न देता, त्याविषयाची त्या मुलाला गोडी कशी लागेल ते पहाण्यासाठी हे करावे. अर्थात ह्यात काही नियम आणुन हे अजुन परिणामकारक करावे. म्हणजे शाळा = परीक्षा = पास/नापास असे समीकरण न राहता, शाळा = शिकण्याची संस्था असे होईल.
९. नुकताच मी माझ्या कॉलेजच्या अलुम्नी च्या कार्यक्रमाला गेलो होतो. सगळ्यांना प्रकर्षाने असे दिसले की, ८०% यशस्वी व्यावसायिक कॉलेजमधे असतांना हुषार मुलांत गणले जात नव्हते. रेटींग/मेझरिंग अँड असेसिंगमधे खूप मोठी गॅप आहे हे लगेच कळते.
ह्यावर विचार व्हावा.