हात केळी खायला जाणे

एखादा लहान मुलगा भांडण घेऊन आईकडे येतो व त्याला दुसऱ्या मुलाने मारल्याची तक्रार करतो.
तक्रार करणारा मुलगा मारणाऱ्या मुलाला एक फटकाही देत नाही.
त्याची आई म्हणते, तू नुसता मार खाल्लास. तुझे हात काय केळी खायला गेले होते का ?

'केळी खायला जाणे' हा शब्दप्रयोग कसा आला असावा ?

तुझे हात काय आंबे चिरायला गेले होते का? तुझे हात काय शेंगा सोलायला गेले होते का ?
असे वा तत्सम शब्दप्रयोग का झाले नसावेत ?