अंतर्मन

लेख कसा लिहावा किंवा चर्चा कशी सुरू करावी हे नक्की माहीत नाही. तरीही धाडस करीत आहे.


अंतर्मनः
मनाचे दोन प्रकारः बहिर्मन आणि अंतर्मन.
बहिर्मन हे सजाण असते, अंतर्मन हे अजाण असते. आपण कोणतीही गोष्ट ऐकली की ती मनात ठेवताना बहिर्मनाने विचार करावा की ती योग्य आहे की अयोग्य? कारण एकदा का अंतर्मनाने ती योग्य म्हणून स्विकारली तर पुढे त्याचे परिणाम तसेच होतात.


मी ह्या विषयावर थोडे फार वाचन केले होते. परंतु पूर्ण आठ्वत नाही आहे. जाणकारांनी ह्यावर लिखाण करावे ही विनंती. पण माझ्या लक्षात राहिलेल्या दोन विचार लिहितो.


उदा १. (हे मला पटले)
एक मुलगा परीक्षेत नापास झाला आहे. दिवसा त्याचे आई-वडिल त्याला जास्त काही बोलत नाहीत. पण खरी परीक्षा पुढे आहे.
रात्री तो मुलगा झोपला असताना त्याच्या आई-वडिलांचे संभाषण. जरी तो मुलगा झोपला आहे तरी त्याचे अंतर्मन जागे असते. आजूबाजूला जे संभाषण चालू आहे ते त्या मुलाचे अंतर्मन ऐकत असते. जर आई-वडिलांनी असे म्हटले की "हा मुलगा वाया गेला आहे. त्याचे आता पुढे कसे होणार? हा बहुधा पासच होणार नाही." किंवा "जरी हा आता नापास झाला तरी तो पुढे चांगला अभ्यास करून चांगल्या गुणांनी उत्तीर्ण  होईल" ह्यातील चांगले वाईट त्याच्या मनाला कळणार नाही. ते त्याच्या मनावर बिंबविले जाईल. खरे तर त्या मुलाला कधी आठवणार नाही की असे काही संभाषण झाले होते. पण त्याचे मन हे त्याला त्याच प्रकारे सहाय्य करेल जसे मनावर बिंबविले जाईल.


उदा २. (हे मला पटले नाही)


एक मुलगी दुकानात गेली आहे. तिथे तिला एक कोट खूप आवडतो. पण तिच्याकडे तेवढे पैसे नसल्याने ती तो खरेदी करू शकत नाही. पण तिच्या मनात असते की मी हा कोट विकत घेणारच. संध्याकाळी तिचा प्रियकर एक भेट म्हणून तोच कोट तिला आणून देतो.


आता ह्यात मला पहिले उदाहरण पटते. पण दुसरे नाही. आपल्या मनातील गोष्ट दुसऱ्याला कळणे हे काही वेळा आपण Telepathy (मराठी प्रतिशब्द?) म्हणतो. पण ह्यात अंतर्मनाची शक्ती कोठून आली?


जाणकारांनी हया लेखावर योग्य तो प्रकाश पाडावा ही विनंती.


-देवदत्त