इंग्रजी भाषेमुळे भारतीय समाजात समानता निर्माण होऊ शकते का?

तथाकथित शुद्ध अथवा प्रमाण भाषा सर्वत्र बोलली जात नाही. भारताच्या प्रत्येक प्रांतात त्या त्या भाषेच्या अनेक बोलीभाषा आहेत किंवा उच्चारणपद्धती आहेत. त्यावरून एखाद्याचे ग्रामीणत्व अथवा जात कळू शकते. भारतीय इंग्रजीमध्ये प्रांतानुसार उच्चारभिन्नत्व असले तरी त्यातून उच्च-नीच अशी जातीनिहाय ओळख  पटू शकत नाही. इंग्लंड अमेरिकेमधेही ईंग्लिश भाषा वेगवेगळ्या प्रकारांनी बोलली जाते; पण तिथे जातीप्रथा नाही त्यामुळे फरक पडत नाही. आपलं मत काय आहे?