ह्यासोबत
- १. अध्यात्म : पूर्वभूमिका
- २. निराकाराला जाणण्यात एकमेव अडथळा : व्यक्तिमत्त्व
- ३. चमत्कार आणि रहस्य व ध्यान
- ४. वेळ, अंतर आणि काम
- ५. संसार / संन्यास / भक्तियोग / कर्मयोग
- ६. मन
- ७. पुन्हा एकदा : मन
- ८. भावनेचा गोंधळ आणि पैशाची मजा
- ९. निराकाराचे सर्व पैलू
- १०. काही आध्यात्मिक प्रश्नोत्तरे
- ११. आत्मस्पर्श
- १२. अस्तित्वाशी संवाद
- १३. स्त्री आणि पुरुष
- १४. न्यूनगंड
- १५. गेस्टाल्ट
- १६. (एक) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १६. (दोन) साऱ्या कलहाचं एकमेव कारण : द्वैत
- १७. प्रेम
- १८. मित्र हो!
- १९. सजगता
- २०. हा क्षण
- २१. संगीत
- २२. काल, अवकाश आणि सर्वज्ञता!
- २३. सहल
- २४. या निशा सर्व भूतानां
- २५. (एक) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २५. (दोन) कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन!
- २६. देव, दैव आणि श्रद्धा
- २७. स्वधर्म, साक्षात्कार आणि समाधी
- २८. पैसा
- २९. शरीर
- ३०. भोग
- ३१. (एक) स्मृती
गेस्टाल्ट हा जर्मन शब्द गुर्जीएफ नावांच्या एका सिद्धानी वापरला आहे. गेस्टाल्ट या अर्थाचा मराठी किंवा इतर पारिभाषिक शब्द नाही. गेस्टाल्टचा अर्थ दृष्टीचे रूपांतरण असा आहे. बुद्ध ज्यावेळी " बात तो आखोंके सामने थी और मैं कहाँ कहाँ ढूंढता फिरा" असं म्हणतो आणि आपल्याला समोर बघून निराकार दिसत नाही याचं कारण गेस्टाल्ट हे आहे. दृष्टीला सारखा आकार बघण्याची सवय झाल्यामुळे निराकार दिसत नाही.
हा गेस्टाल्ट बदलण्याचे मी तुम्हाला दोन मार्ग सांगू शकतोः
प्रथम ओशोंचं म्हणणं बघू : ते म्हणतात ज्याप्रमाणे तुम्ही डोळ्यांनी समोर बघता त्याचप्रमाणे मागे (किंवा स्वतःकडे, म्हणजे बघणाऱ्याकडे) देखील बघू शकता. आत्ता या क्षणी तुम्ही समोरची वस्तू बघा आणि त्याच वेळी स्वतःकडे देखील बघायचा प्रयत्न करा. तुम्हाला आता नुस्ती समोरची वस्तू दिसणार नाही तर तिच्या अवतीभवतीची जागा देखील दिसू लागेल. तुमचे विचार थांबतील, तुम्हाला शांत वाटायला लागेल. नजरेला असं बघायची सवय नसल्यामुळे तुम्हाला सुरुवातीला जरा अवघड वाटेल पण नुस्त्या गेस्टाल्ट चेंजनी एका क्षणात तुम्हाला हलकं वाटायला लागेल. तुम्हाला नुस्ती वस्तू न जाणवता तुमच्या शरीराच्या भोवतालची जागा सुद्धा जाणवू लागेल, हा निराकाराचा बोध आहे. कोणत्याही सिद्ध पुरुषाचे डोळे बघा (तुम्हाला मंजूर असेल तर ओशोंचे बघा) ते स्थिर दिसतात. ही स्थिरता नजरेचा गेस्टाल्ट बदलल्यामुळे आलेली असते. ती नजर एकाच वेळी आकार आणि निराकार दोन्ही बघत असते.
नुकत्याच जन्मलेल्या लहान मुलाचे डोळे बघा, ते निराकाराशी अनाहूतपणे संपर्क ठेवून असतात. आपण म्हणतो मुलाची नजर अजून स्थिर झाली नाही. हळूहळू मुलाला फोकसिंग शिकवले जाते आणि कोणतीही गोष्ट जाणण्यासाठी ते अनिवार्यपणे करायला लागते, मग त्याचा निराकाराशी संपर्क सुटतो.
दुसरी पद्धत देखील सोपी आहे : आत्ता या क्षणी डोळे मिटा, तुम्हाला शरीर बसलं आहे आणि आपल्याला समजतं आहे असं जाणवू लागेल. आता हा बोध स्थिर ठेवून समोरच्या वस्तूकडे बघा, तुम्हाला प्रथमच वस्तू आणि तुम्ही यामधलं अंतर जाणवू लागेल. तुमचा गेस्टाल्ट बदलला! ही दृष्टीच्या रूपांतराणामुळे होणारी निराकाराची किंवा स्वतःची जाणिव आहे. पूर्वी तुम्हाला नुसत्या वस्तू जाणवायच्या, आता तुम्हाला तुमची उपस्थिती आणि वस्तू दोन्ही जाणवू लागतील.
गेस्टाल्ट बदलल्यामुळे जीवनात अनेक परिवर्तनं घडून येतातः
कोणत्याही खेळात किंवा नृत्यात प्राविण्य मिळवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शरीरापासूनचं वेगळेपण जाणवणं, सगळा रियाज फक्त या एका गोष्टीसाठी चालू असतो, बाकी कौशल्य, स्वतःची स्टाइल वगैरे नंतर येतं. गेस्टाल्ट बदलल्यामुळे तुम्हाला आपण शरीरापासून वेगळे आहोत असं जाणवू लागेल आणि शरीरात एक हलकेपणा जाणवू लागेल.
तुम्ही जीवनाकडे आणि कोणत्याही प्रश्नाकडे त्याच्या समग्रतेनी बघू लागाल, सध्या तुम्ही ज्या डिटेल्समध्ये निष्कारण शिरता आणि गुंतून पडता ते कमी होईल. तुमच्या आकलनाचा आवाका वाढेल, एखादी गोष्ट तुम्हाला सुरुवातीपासून शेवट पर्यंत कळू लागेल. तुम्ही आकारात अडकल्यामुळे निराकाराची सुटका दिसत नाही, ती कळू लागेल, आता सर्व पर्याय संपले असं वाटत असताना अचानक नवा पर्याय उपलब्द्ध होइल.
मुख्य म्हणजे, सारखे आकार बघायची सवय आणि नजरेनी संवेदना ग्रहण जवळजवळ पंच्याहत्तर टक्के असल्यामुळे सर्वात जास्त ताण मानवी डोळ्यांवर आहे (पण त्याची आता इतकी सवय झाली आहे की तो जाणवत नाही); गेस्टाल्ट बदलल्यानी तुमच्या नजरेवरचा आणि पर्यायानी मनावरचा ताण कमी व्हायला लागेल.
एकदा तुमचा नजरेचा गेस्टाल्ट बदलला की इतर संवेदनांचे पण गेस्टाल्ट बदलू लागतील कारण नजरेचा आकलनासाठी सर्वात जास्त वापर आहे. आता तुमच्या एकण्याचा गेस्टाल्ट हळूहळू बदलू लागेल; आवाजा बरोबर आता तुम्हाला शांतता देखील ऐकू यायला लागेल. गाण्याचा किंवा वादनाचा सगळा रियाज कलाकाराला जर शांतता ऐकू आली नाही तर व्यर्थ होतो; कारण आवाज जरी प्रत्येकाचा वेगळा असला तरी ज्या पडद्यावर सूर उमटायचे ती शांतता एक आहे आणि जो पर्यंत त्या शांततेचा फिल येत नाही तो पर्यंत स्वराला गोडवा येत नाही. मजा म्हणजे तुम्हाला तुमचा आवज गोड वाटू लागेल!
इतर तीन संवेदनांमध्ये देखील फार खोलवर बदल घडून येतात. तुमची भूकेची संवेदना तीव्र होइल, मुख्य म्हणजे तुम्हाला काय खावं याचा अंदाज येऊ लागेल. चवीचा सध्या उपयोग एकमार्गी आहे, भूकेची जाणिव हरवली आहे (खरं तर ती वेळेशी निगडीत झाली आहे). रूचीचा गेस्टाल्ट बदलल्यामुळे तुम्हाला 'भूक आणि काय खावं' हे दोन्हीही समजू लागेल आणि सगळ्यात मोठी मजा म्हणजे ते तुम्ही आहात तिथे आणि सहज उपलब्ध असेल!
गंधाची संवेदना तीव्र झाल्यामुळे तुमच्या टूथपेस्ट पासूनच्या आवडी बदलू लागतील. पूर्वी दांत घासणं निव्वळ दुर्लक्षीत काम होतं त्यात आता तुम्हाला स्वाद आणि गंध हे परिमाण दिवसाच्या आगदी सुरुवातीला जाणवू लागेल. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल पण पहिल्यांदा तुम्हाला आपला श्वास चालू आहे हे जाणवेल! तुमचा श्वास, विचारातून सुटल्यामुळे काही क्षण मोकळा होईल. यथावकाश तुमच्या टॉयलेट सोप पासून सगळ्या आवडीनिवडी बदलून तुम्हाला स्वतःभोवती कायम स्वच्छ हवा हवी असं वाटू लागेल; आगदी दहा मिनीटं जरी कुठे गेलात तरी खिडक्या उघडाव्याश्या वाटतील. एसी ऐवजी फॅन बरा वाटू लागेल!
बघण्याच्या संवेदनेला अवास्तव महत्त्व दिल्यामुळे सिनेमा, टिव्ही, सहली या गोष्टींना अमर्याद महत्त्व प्राप्त झलयं; नंतर श्रवण, त्यामुळे काहीतरी सतत कानावर पडल्या शिवाय चैन पडत नाही, नंतर उरतो स्वाद त्यामुळे हॉटेल्स जोरात. इथे संवेदनांच काम जवळजवळ संपल्यामुळे गंध आणि स्पर्श यांना नगण्य महत्त्व राहिलं आहे. तुम्हाला क्वचितच जाणवलं असेल की या सर्वात जीवलग संवेदना स्पर्श आहे आणि या सगळ्या धावपळीत ती संवेदना पूर्ण दुर्लक्षिली गेली आहे. प्रणयाची सगळी जादू आणि इतकं अनावर आकर्षण केवळ स्पर्शाच्या संवेदनेमुळे आहे; म्हणजे निसर्गाची तशी योजना आहे.
स्पर्शाचा गेस्टाल्ट बदलणं अध्यात्मातलं बहुदा सर्वात महत्त्वाचं परिमाण आहे. तुम्ही संवेदनेकडून ज्याला संवेदना होते आहे त्याच्याकडे (म्हणजे स्वतःकडे) वळता. तुम्हाला कळतं की भोग जरी कोणताही असला तरी भोगणारा एकच आहे आणि तो एकदा स्थिर झाला की सगळे भोग सारखे आहेत.
संजय