म्युच्युअल फंड भाग ४

एम आय पी या सरमिसळ म्युच्यअल फंडाची ओळख करून झाल्यानंतर आपण आता मुख्य
प्रकारच्या म्युच्युअल फंडाकडे वळू या.

मी अगोदर सांगितल्याप्रमाणे म्युच्युअल फंडमधे पैसे गुंतवल्यास चांगला नफा
होउ शकतो.

तर मग हे कुठल्या प्रकारचे म्युच्युअल फंड्स ?

हे आहेत इक्वीटी म्युच्युअल फंड्स !

त्याच्याकडे वळण्याअगोदर आपण आणखी एका सरमिसळ म्युच्युअल फंडबद्दल विचार
करू या.

तो आहे बॅलन्स फंड!

या बॅलन्स फंडात जमलेले पैसे फंडाचा मॅनेजर काही ठराविक प्रमाणात डेट
मधे(कंपन्यांचे डेट्स म्हणजे कमर्शियल पेपर्स वगैरे किंवा सरकारी
सेक्युरिटीज) व इक्वीटी मधे गुंतवतो.

हे प्रमाण साधारणत: ६५% ते ७५% इक्वीटी व २५% ते ३५% डेट असू शकते.

या प्रकारचा फंड मला वैयक्तीकरित्या आवडतो.

याची काही कारणे आहेत. ती अशी :

या प्रकारच्या फंड्सचे रिटर्नस किंवा मिळणारा नफा हा चांगल्यापैकी आहे. जर
या प्रकारच्या फंड्सचा इतिहास बघितला तर या प्रकारच्या फंड्सनी साधारणतः
१५% ते २०% वार्षिक नफा सर्वसाधारणतः गेल्या पाच वर्षात दिला आहे.(बाजाराच्या
चढत्या काळात याहूनही जास्त आहे. पण मी उगाचच मोठे आकडे देऊ इच्छित नाही.)

तसेच शेअर बाजार जरी पडले तरी या फंड्सच्या पैश्याची गुंतवणूक डेटमधे
असल्यामुळे जितके शेअर मार्केट पडेल तेवढ्याप्रमाणावर या फंडची किंमत
म्हणजे एन ए व्ही कमी होत नाही. कारण त्या काळात या फंड्सचे पैसे जे डेटमधे
गुंतवलेले असतात त्याची किंमत कमी होत नाही. त्यामुळे या प्रकारच्या
बॅलन्स फंड्बद्दल एक प्रकारची खात्री वाटते. एक लांब अवधीचा पोर्टफोलिओ
तयार करण्यासाठी या प्रकारच्या फंडचा उपयोग होतो.

त्यानंतर आता वळू या प्युअर इवीटी फंडकडे!

या फंडमधील पैसे फंडचा मॅनेजर पूर्णपणे शेअरमधेच गुंतवतो. त्यामुळे या
इक्वीटी फंडची किंमत किंवा एन ए व्ही ही शेअर बाजाराच्या चढण्या उतरण्यावर
पूर्णतः अवलंबून असते.

ज्यावेळी शेअर बाजार चढत असतो त्यावेळी या फंडमधे गुंतवलेले पैसे चांगला
नफा मिळवून देतात. या प्रकारातल्या काही चांगल्या फंडस नी मागच्या वर्षी
अगदी ८०% ते १००% सुध्दा नफा मिळवून दिलेला आहे. पण..... बाजाराच्या पडत्या
काळात याची किंमत त्याच वेगाने कमी होत असते. त्यामुळे २००८ साली या
फंडसची किंमत बरीच कमी झाली .त्यावेळी शेअर बाजाराचा पडता काळ होता.

अर्थात २००८ साली झालेले नुकसान या फंडसनी २००९ मधे व त्यानंतर पूर्ण भरून
काढले.

एवढेच नव्हे तर चांगला फायदाही करून दिला आहे. या फंडचा जर पाच वर्षाचा
विचार केला तर वार्षिक साधारण २०% ते २५% नफा होउ शकतो.

त्यामुळे जर जोखीम घ्यायची तयारी असेल व शेअर बाजाराकडे थोडे लक्ष ठेवून
वेळोवेळी जर नफा झाल्यावर यातून पैसे काढून घेतले तर चांगला फायदा होउ
शकतो.

कमशः