म्युच्युअल फंड भाग ६

आता आपण बरीच वाटचाल केली. म्युच्युअल फंड्चे फंडाज(मुलभुत माहिती)
समजून घेतली, कुठल्या प्रकारच्या म्युच्युअल फंड्स पैसे गुंतवल्यावर जास्त
नफा होउ शकतो याचा अंदाज घेतला. तसेच महत्वाच्या म्युच्युअल फंड हाउसेस(जे
हे म्युच्युअल फंड चालवतात) यांचा आढावा घेतला. आता वेळ आली आहे काही काही
म्युच्युअल फंड्स जे चांगला नफा देऊ शकतात त्या फंड्सचा विचार करण्याची.
मी सोयीसाठी या टिकाणी फक्त एम आय पी, बॅलन्स व इक्वीटी म्युच्युअल फंडचाच
विचार करू इच्छितो.
प्रथम काही एम आय पी च्या फंड्सबद्दल :
एकंदरीत झालेला नफा%
फंड ६महिने १वर्षे २वर्षे ३वर्षे
रिलायन्स एमआयपी ४.२, १८.१, १८.६, १४.६
एचडीएफसी लाँग टर्म एमआयपी ४.०, २२.३, १४.१, १२.४
बिर्ला स.ला.एमआयपी-॥ वेल्थ २५ ३.१, १५.८, ८.७, ७.८

यावरून एक लक्षात येइल की जर एम आय पी फंडमधे एस आय पी करून शिस्तबध्द
पध्दतीने पैसे गुंतवले तर बॅन्केच्या फिक्स डिपॉझिट एवढा नफा नक्कीच मिळू
शकतो.

यानंतर आपण बॅलन्स फंडकडे वळू या :
एकंदरीत झालेला नफा%
फंड ६महिने १वर्षे २वर्षे ३वर्षे ५वर्षे
रिलायन्स आरएसएफ बॅलन्स १०.६, ५३.४, १९.१, १९.९, --
एचडीएफसी प्रुडन्स फंड १०.४, ६९.०, १८.८, १६.७, २४.१
एचडीएफसी बॅलन्स फंड ११.६, ५५.४, १५.५, १५.५, १८.८
बिर्ला स.ला. ९५ फंड ७.७, ५२.८, १३.६, १४.८, २१.६
डीएसपी बीआर बॅलन्स फंड ७.१, ४९.८, १०.५, १४.४, २२.२

यातील सहा महिन्याचे आकडे एकंदरीत असून वर्षाचा नफा हा सरासरी आहे. हे
नफ्याचे आकडे मागच्या शुक्रवारच्या म्हणजे १४.०५.२०१० च्या एनएव्हीवरती
आधारीत आहेत.

हे आकडे अर्थातच भुलवून टाकणारे आहेत! नाही का! याचा अर्थ हाच की जरा
वेगळा विचार केला तर नक्कीच चांगली संपत्ती जमवता येइल.

अर्थात चूकभूल द्यावी घ्यावी! व हा पैसे या फंडात गुंतवण्यासाठी सल्ल
नाही. गुंतवणूक ज्याने त्याने स्वतः अभ्यास करून ठरवून करावी.

क्रमश: