म्युच्युअल फंड भाग ८

एक ज्येष्ठ माननीय वाचक श्री रमताराम यानी एक महत्वाची गोष्ट सांगितली, जी माझ्याकडून अनवधानाने राहून गेली ती अशी:
म्युच्यअल फंड इतका तरल(लिक्वीड), पारदर्शक(फंडाचे पोर्टफोलिओ नियमित प्रकाशित केले जात्तात), इनफ्लेशन फॉलो करणारा, ऑनलाइन सुविधा असलेला दुसरा कोणताही पर्याय नाही. प्रत्यक्ष शेअर्स अधिक नफा देणारे असू शकतात पण अधिक जोखमीचे व एजंटच्या टिप्सवर अवलंबून असल्याने जास्तच जोखमीचे,............
म्युच्युअल फंडमध्ये गुंतवताना आणखी एक गोष्टीची जाणीव ठेवावी ती म्हणजे 'कट आउट टाइम'.
ज्या दिवशी आपण पैसे गुंतवायला म्युच्युअल फंडची स्लिप व चेक रजिस्ट्रारकडे देतो त्यादिवशी दुपारी ३वाजेपर्यंतच त्यादिवसाची एन ए व्ही मिळेल. याला 'कट आउट टाइम' म्हणतात. हा वेळ एम आय पी, बॅलन्स, डेट व इक्वीटी या फंडसना आहे. काही लिक्वीड फंडसना सकाळी ११. ३० वाजताचा 'कट आउट टाइम' आहे.
तर इथपर्यंत आपण म्युच्युअल फंङात गुंतवणूक कशी करता येइल ते पाहिले. पण म्युच्युअल फंडमधून पैसे कधी काढायचे? हे प्रत्येकाच्या आर्थिक गरजेवर, शेअर मार्केटच्या स्थितीवर वगैरे अवलंबून आहे. तरीही काही सर्वसाधारण नियम इथेही अमलात आणता येतीलः
१. बऱ्याच काळासाठी एखाद्या फंडात पैसे गुंतवल्यानंतर जर तुमच्या गरजेप्रमाणे किंवा अपेक्षेप्रमाणे त्यात वाढ झाली असेल तर त्या फंडातून सर्व किंवा काही प्रमाणात पैसे काढून घेणे चांगले.
२. तुमच्या असे लक्षात आले की ज्या फंडात तुम्ही पैसे गुंतवलेत त्या फंडाची एनएव्ही वाढण्याचा दर विशेष चांगला नाही तर पैसे काढून घ्यावेत. एखादेवेळेस यात थोडेसे नुकसान होण्याची शक्यता असते, तरीही जो फंड विशेष दराने वाढतो आहे त्यात काढलेले पैसे गुंतवल्यास अधिक चांगला नफा होऊन नुकसान भरून निघेल.
३. ज्यावेळी तुम्ही पैसे गुंतवलेला फंड त्याच्या बेंचमार्क इंडेक्सच्या तुलनेत नेहमीच मागे पडत असेल किंवा तश्याच प्रकारच्या दुसऱ्या फंडांच्या तुलनेतही मागे पडत असेल तर गुंतवलेले पैसे लगेच काढणे चांगले.
४. काही वेळा फंडाचे उद्दिष्ट बदलतात व नवीन उद्दिष्ट योग्य वाटत नसेल. उदा. एखाद्या फंडात तो मिडकॅप फंड आहे म्हणून पैसे गुंतवले व जर या फंडाने लार्ज कॅपमध्ये जाण्यास सुरवात केली. तर अशावेळी उद्दिष्ट योग्य वाटले नाही तर पैसे काढून घ्यावेत.
५. एखाद्या फंडाच्या खर्चाची एकदम वाढ झाली असेल तर अशावेळी तुमच्या गुंतवणूकीवर कमी नफा होइल कारण फंडची गुंतवणूक कमी होइल. तेव्हा इथून बाहेर पडून दुसऱ्या फंडात पैसे गुंतवावेत.
६. शेवटी जर आर्थिक निकड असेल तर फारसा विचार न करता सऱळ पैसे काढून घ्यावेत. नेहमी पैसे गुंतवण्याच्या संधी तर येतच असतात.

म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्यासाठी उपयुक्त माहिती बऱ्याच धाग्यांवर मिळते त्यापैकी काही याप्रमाणे:
दुवा क्र. १
दुवा क्र. २
दुवा क्र. ३
दुवा क्र. ४ -
दुवा क्र. ५ -
दुवा क्र. ६ -
दुवा क्र. ७
दुवा क्र. ८
दुवा क्र. ९ -
दुवा क्र. १०
दुवा क्र. ११ -
दुवा क्र. १२ -
दुवा क्र. १३
दुवा क्र. १४
दुवा क्र. १५
दुवा क्र. १६
दुवा क्र. १७
दुवा क्र. १८

तुमची गुंतवणूक तुम्हाला तुमच्या आर्थिक उद्दिष्टांपर्यंत घेऊन जावो हिच इच्छा!