म्युच्युअल फंड भाग ७

चला! आता इतर सर्व फंडांचा विचार केल्यानंतर फक्त एक्वीटी फंड किती नफा मिळवून
देतात याचा विचार करू.
हा माझा लेख तुम्हाला फक्त जंत्रावळी वाटेल तरीही तो धोका
पत्करून मी तुमच्यापुढे काही आकडेवारी मांडू इच्छितो.
आता फक्त इक्वीटी फंडानी
दिलेला नफा किती ?: हे आकडे २१ तारखेच्या संध्याकाळी प्रसिध्द झालेल्या नेट अ‍ॅसेट
व्हॅल्युवर अवलंबून आहेत.
नफा टक्क्यात (%) सहा महिन्याचे आकडे हे एकंदरीत असून
१, २, ३, ४ वर्षाचे आकडे हे सरासरी आहेत. तसेच हे सर्व या फंडातील ग्रोथ (फक्त वाढ)
या प्रकाराचे आहेत.
फंड ६महिने १ वर्ष २वर्षे ३ वर्षे
५वर्षे
डीएसपी बिआर इक्वीटी फंड ४.२, ३७.४, ९.९, १३.३,
२७.९,
एचडीएफसी टॉप २०० १.१, ३५.५, १३.३, १५.५, २७.४,
एच डी एफ सी इक्वीटी
४.४, ४५.८, १६.५, १४.७, २७.३,
रिलायंन्स ग्रोथ ६.७, ३८.२, ८.७, १४.२,
२६.९,
आयसीआयसीआय प्रु डायनॅमिक ७.५, ४१.२, ८.७, १०.२, २६.९,
सुन्दरम सिलेक्ट
मिडकॅप ३.४, ४१.९, १०.५, ११.४, २६.४,
एस बी आय मॅगन्म मल्टीप्लायर प्लस ३.६,
३३.४, ७.५, १०.४, २६.२,
रिलायन्स इक्वीटी ऑपॉरच्युनिटीज १२.८, ५८.८, १४.९, १०.९,
२५.२,
फिडॅलिटी इक्वीटी ५.०, ३९.३, १०.०, ९.९, २४.९,
बिर्ला स.ला.मिडकॅप ए
०.९, ४४.९, १०.२, १२.८, २४.२,
फ्रन्कलिन ईन्डीया ब्लुचिप २.६, २९.६, ९.२, १०.४,
२३.९

या सर्व फंडची आकडेवारी देताना मी एक गोष्टीचा विचार केला आहे की हे सर्व फंड
सतत पाच वर्षे चांगला नफा करून देत आहेत. असे आणखी ही फंडस आहेत पण एवढी अकरा नावे
विचार करायला पुरेशी आहेत.
तसेच मागच्या एका वर्षापूर्वी जरी शेअर बाजार पूर्ण
पडीव अवस्थेत होता तरी यां फंडात ज्यानी पैसे गुंतवले व न घाबरता पैसे गुंतवलेल्या
अवस्थेतच ठेवले त्याना नुकसान तर नक्केच झाले नाही तर चांगला नफा झाला आहे.
आणखी
एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे की सध्या शेअर मार्केट परत घसरणीवर आहे. सेंसेक्स
१७५०० वरून १६४४५वर तर निफ्टी ५२५०वरून ४९३१ वर आहे, तरीही या फंडामधे ज्यानी लांब
अवधीसाठी पैसे गुंतवले असतील त्याना चांगला नफा झाला आहे.
दिलेल्या आकडेवारी
वरून जर बघितले तर एक लक्षात येइल की सरासरी ५ वर्षासाठी २५% नफा होउ शकतो.
आता
जर मी अगोदर दिलेल्या ७२ चा नियम लक्षात घेतला तर साधारण तीन वर्षात गुंतवलेले पैसे
दुप्पट होतील. मला वाटते की हा नफा विचार करायला नक्कीच लावणारा आहे. नाही का?

अर्थात चुक भूल द्यावी व घ्यावी! मी काही फंडच्या नफ्याची आकडेवारी दिलेली आहे,
ज्याने त्याने अभ्यास करून गुंतवणूक करावी. कारण मी काही गुंतवणूकीचा सल्ला देत
नाही आहे.

क्रमशः