हेऽ मन माझे - प्रियकरासाठि पिसे२
झेप पतंगापरि - प्रीतिवर घेत असे
जळणे
प्रीतिमधे - हे मला येत असे
सुटका आज तुझी - सख्या मज कठिण दिसे
हेऽ मन
माझे - प्रियकरासाठि पिसे ।ध्रु।
ते खरे .. प्रेम जे .. प्रियकर-अर्पित व्हावे
जीव देउन .. भेट ही .. मी जिवाची .. मागतसे१ ।१।
हेऽ मन
माझे - प्रियकरासाठि पिसे
क्षण क्षण .. अस्थिर मन .. हृदयि असे वादळले
लाभतसे .. ध्येय ते .. ज्यास मनी वांछियले
स्पंदने .. ही तुला .. विसरणे .. शक्य नसे१ ।२।
हेऽ मन
माझे - प्रियकरासाठि पिसे
टीपा :
हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.
१. ह्या ओळी गीतकाराने गालगा .. गालगा .. गालगा .. गागागा अश्या तर संगीतकाराने गालगाऽ .. गालगाऽ .. गालगाऽ .. गालगा अश्या घेतलेल्या आहेत. आणि गायिकेने शेवटचे गागा हे लगा सारखे म्हटलेले आहेत. (मी दोन्हीचा फायदा घेत गालगा(गा) .. गालगाऽ .. गालगा(गा) .. गाललगा अश्या केलेल्या आहेत. अर्थात चालीत म्हणताना काहीही फरक पडत नाही. )
२. अगदी मूळ गाण्याच्या लगावलीत बसवायचे तर
हेऽऽ मन्मन - प्रियकरासाठि पिसे ... असे भाषांतर करता आले असते. मी हेऽऽ ऐवजी
हेऽ असे करून रिकामी झालेली जागा वापरली आणि भाषांतर सोपे केले
चाल : मूळ गाण्याचीच! (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल )
विनंती :
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका. (किंवा नुसते अभिनंदन करूनका काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे
)