सुर हे तुझे अन् माझे गीत

सुर हे तुझे अन् माझे गीत
भेटून दोघे - होईल प्रीत ।ध्रु।

सामावसी रे - तू स्पंदनी
भरुनी रहासी - तू चिंतनी
जगती हजारोऽजण भेटले
भरलास परि तूच तू मन्मनी
तू मित्र माझा - मी तुज अर्पीत ।१।
भेटून दोघे - होईल प्रीत

जर सोडुनी दूर जाशील तू
मजला कधी जर  विसरशील तू
मत्प्रीतिचे पुण्य असलेच तर
ओढून मजप्रत परतशील तू
बघशील, माझी - होईल जीत ।२।
भेटून दोघे - होईल प्रीत

टीपा :

२. याला अनेक पर्याय सुचले. दोन्ही मिळुनी होईल प्रीत, दोघे मिळुनी होईल प्रीत
वगैरे. आणखीही शक्य आहेत. मूळ अर्थाशी मला हे जास्त योग्य वाटले.

१. शब्दशः जगतात लाखोऽजण भेटले. जगतात ह्याचा अर्थ वेगळा होऊ नये म्हणून शब्द बदलले.

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

चाल : मूळ गाण्याचीच!   (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ... ईत शी जमवा बरका!