विकृत विनोद - कि व्यक्तिस्वातंत्र्य?

आत्ताच फु बाई फु च्या दुसर्या पर्वाचा पहिला भाग पाहिला आणि सुन्न मनानं हे लिहायला घेतलं.

शेवटच्या विनोदी (कि विकृत?!!) जोडीनं हिटलर वर विडंबन केलं होतं. सगळं काही खेळीमेळीत चाललं होतं. म्हणजे काय होतं, हिटलर नावाचा तो हुकुमशहा मुंबापुरीत येतो आणि त्याला भेटते ठमी. ही ठमी हिटलर हून १०० पट ढाक. तो तिच्यापुढे अगदी कोकरू होतो आणि म्हणतो, "अगं ज्यानं ज्यूंना किडा मुंगीसारखं मारलं, त्या हिटलरला तु (हिंदी) जु इतकीपण किंमत देत नाहीस."

आणि इथे माझं डोकं बधिर झालं. याला काय म्हणायचं? एका बड्या वाहिनीच्या कलाकारांचं 'व्यक्तिस्वातंत्र्य' की एका फक्त हसण्याशी मतलब असलेल्या समाजाची संवेदनहीनता, कि विनोदाची झालर पांघरलेली विकृती?

ब्रिटीशांनी लाठीमार केलेले स्वातंत्र्यवीर, जालियानबाग चे बळी, फार कशाला, मुंबई, पुण्याच्या स्फोटांमध्ये मारले गेलेले जीव, राजरोसपणो बलत्कार झालेल्या तरुणी, मुली, लातुर आणि गुजरातच्या भुकंपाचे बळी, यांच्यावर विनोद केलेले आवडतील आपल्याला?

ज्यांना याची तिव्रता जाणून घ्यायची आहे, त्यांनी गुगल मध्ये 'चित्रशोध' कराव आणि इंग्रजी 'होलोकौस्ट' हा शब्द टाकून पहा.

फार बोलत नाही.

सुन्न

प रे ग