ईश्वरा , देशील तो स्वीकारला मी न्याय रे

ईश्वरा, देशील तो स्वीकारला मी न्याय रे
तुजपुढे अत्यंत आहे दास तव असहाय रे ।ध्रु।

थडकले जणु भिंतिवर प्रत्येक माझे साकडे
निष्प्रभाव बनून गाऱ्हाणे परतले मजकडे
नभ धरेपासून इतके दूर आहे काय रे? ।१।
तुजपुढे अत्यंत आहे दास तव असहाय रे

फूल एखादे गळे तर नष्ट होते बाग का?
काय झाले, विझवुनी तू मम गृहीच्या दीपका
तम न जोवर दर कुडीत प्रकाश तू भरलाय रे ।२।
तुजपुढे अत्यंत आहे दास तव असहाय रे

पर्यायः

१. वाटते, आहे धरेपासून दूर विहाय रे .... विहाय म्हणजे आकाश अशी माहिती कळल्यावर अशी ओळ मनात आली होती पण तो मोह आवरला!

२,
तुजपुढे तव दास आहे सर्वथा असहाय रे... किंवा
तुजपुढे तव दास आहे जाहला
असहाय रे

हे गाणे मला जसे ऐकू आले आणि उमजले आणि त्याचे शब्द जसे जालावर मिळाले (आणि ते उमजले  ) त्याप्रमाणे मी भाषांतराचा प्रयत्न केलेला आहे.

टीपा:

चाल : मूळ गाण्याचीच!  (गालगागा गालगागा गालगागा गालगा) (मात्र त्यासाठी आधी गाणे ओळखावे लागेल  )

विनंती :

१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा. कोडे अवघड करण्यासाठी 'छन्न ध्रुवपद' लिहिलेले आहे शेवटी उत्तर सांगेन तेव्हा प्रशासक, कृपया ध्रुवपद आणि शीर्षक बदलावे.
२. फक्त गाणे ओळखू नका.  (किंवा नुसते अभिनंदन करूनका  काय आवडले नसेल, चुका असतील तर त्याही सांगा. )... (मात्र गाणे ओळखणे अनिवार्य आहे  )

३. ध्रुवपदाचे भाषांतर सुचत असेल तर तेही सुचवा. यमक ...   आय रे असे जमवा बरका. यमकाची जागा ठळक केलेली आहेच.